उधारीचे 20 रुपये मागितल्याने तरुणाला संताप अनावर झाला, मग जे घडलं त्याने सारा गाव हादरला !

उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून तरुणाला राग आला. मग चाट विकणारा तरुण आणि आरोपीमध्ये जरोदार वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उघडकीस आलं त्याने सर्वच हादरले.

उधारीचे 20 रुपये मागितल्याने तरुणाला संताप अनावर झाला, मग जे घडलं त्याने सारा गाव हादरला !
उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणातून तरुणाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:48 PM

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून चाट विकणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ फेकला. धनराज असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणाही आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

उधारीचे पैसे मागितले म्हणून धमकावले

धनराजचा गावात चाटचा स्टॉल होता. गावातील अशोक यादव या तरुणाने पाच दिवसापूर्वी धनराजकडे 20 रुपयांचा चाट उधारीवर खाल्ला होता. अशोकने पैसे न दिल्याने धनराजने काल त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले. यावरुन अशोक संतापला आणि धनराजला शिवीगाळ करु लागला. पाहता पाहता वाद वाढत गेला आणि मारामारी झाली. यावेळी गावातील लोकांनी मध्यस्थी करुन दोघांचे भांडण सोडवले. यानंतर अशोक धनराजला बघून घेऊन अशी धमकी देऊन निघून गेला.

सामान आणायला गेला तो परतलाच नाही

दुसऱ्या दिवशी सकाळी धनराज धंद्याचे सामान आणण्यासाठी घरुन गेला तो परतलाच नाही. रात्र झाली तरी धनराज परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. दुसरीकडे जीआरपी पोलिसांना रेल्वे ट्रॅकजवळ धनरजाचा मृतदेह मिळाला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शिवरामपूर पोलिसांकडे सुपूर्द केला. धनराजच्या कुटुंबीयांनी अशोक यादव याच्यावर हत्येचा आरोप केला आहे. पोलीस सर्व घटनेचा सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.