Malegaon : मालेगावात गोळीबार हवेत झाला, धावपळीत एका इसमाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला
कायदा आणि सुव्यवस्थेला नियमित गालबोट लागणाऱ्या मालेगाव (Malegaon) शहरात पुन्हा एकदा भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने शहर हादरले आहे.
मालेगाव – कायदा आणि सुव्यवस्थेला नियमित गालबोट लागणाऱ्या मालेगाव (Malegaon) शहरात पुन्हा एकदा भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने शहर हादरले आहे. पवारवाडी (Pawarwadi) भागातील एका कारखानदाराकडे असलेली रोकड लुटण्यासाठी संशयित दरोडेखोरांनी कारखानदारावर हल्ला केला. मात्र सुदैवाने दरोडेखोरांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. कारखानदाराशी झालेल्या झटापटीत स्थानिकांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य तिघे फरार आहेत. कारखानदार आणि दरोडेखोर यांच्या जोरदार झटापटी झाली. या झटापतीत दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला.मालेगाव शहरात वारंवार गोळीबाराच्या घटना घडत (crime story) असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पकडलेल्या आरोपींच्या गावठी कट्टा व एक जीवंत काडतून जप्त
पकडलेल्या आरोपींच्या गावठी कट्टा व एक जीवंत काडतून जप्त केले तर अन्य तिघे फरार आहेत. संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कारखानदार यांच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. यावेळी संशयितांना पकडण्यासाठी अनेकांनी धावपळ केली. यात जाकीर हुसेन जनाब अली (वय 54, रा. उत्तरप्रदेश) हे देखील मदतीला धावून गेले. मात्र या धावपळीत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मालेगाव शहरात गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. सर्रासपणे गोळीबार, तलवार बाळगणे, धारदार शस्त्राने वार करणे, गावठी कट्टे, काडतूस, मारहाण आदी घटना नित्याच्या झाल्या आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यात संबंधित प्रशासनाला अपयश येत आहे. याशिवाय किरकोळ वादातून देखील गावठी कट्टे वापरणे, तलवारीने वार करणे आदी घटना घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.