मालेगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत पाच गावांमध्ये दरोडा

उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. यामुळे ग्रामीण गावात लोक गरमीपासून बचाव करण्यासाठी छतावर झोपतात. याचाच फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

मालेगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत पाच गावांमध्ये दरोडा
मालेगावात एकाच रात्रीत पाच गावात दरोडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:21 AM

मालेगाव : मान्सून लांबणीवर पडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात उन्हाने लाही लाही केली आहे. यामुळे ग्राणीण भागात लोक रात्री गरमीपासून बचाव करण्यासाठी घराला कुलूप लावून गच्चीवर झोपतात. याचाच फायदा चोरटे घेत आहेत. यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मालेगाव तालुक्यातही कळवाडीसह पंचक्रोशीतील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत पाच गावांमध्ये दरोडे टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरट्यांनी 16 लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु

मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील कळवाडीसह पाडळदे, दहिवाळ, चिंचगव्हाण गावांमध्ये रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने जबरी दरोडा टाकला. यामध्ये तब्बल 15 लाख 90 हजार 500 रुपयांचा मुदद्देमाल लंपास झाला. संशयित दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून, याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण माळमाथा परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नांदेडमध्ये कारचालकाला लुटणारी टोळी जेरबंद

कारचालकाला वाटेत अडवून त्याच्याकडील 11 लाख 64 हजार रुपये लुटणाऱ्या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयासमोर 30 मे रोजी कार अडवून मुनिमला लुटण्याची घटना घडली होती. चोरट्यांनी दोन मोटार सायकल आडव्या लावून मुनिमकडील रोकड लुटली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून 5 लाख 60 हजार रुपये हस्तगत केले आहेत. दरम्यान, यातील 1 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनास कुमार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.