Nagpur Police Crime : नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने घेतला गळफास, मुख्यालयातील सभागृहातच स्वतःला संपविले
शशिकुमार शेंडे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते या ठिकाणी सेवेत हजर होते. आज दुपारी त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
नागपूर : नागपूर पोलिसांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मुख्यालयातच स्वतःला गळफास लावला. त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षकानं असा आत्मघाती निर्णय का घेतला, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केली. शशिकुमार शेंडे (Sasikumar Shende) असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. शशिकुमार गेल्या तीन वर्षांपासून पोलीस मुख्यालयात तैनात होते. त्यांच्या पत्नीही पोलीस विभागात तैनात आहेत. आज दुपारी मुख्यालयातील सभागृहात (in the HQ Auditorium) गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्तेचं कारण अस्पष्ट आहे. नागपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (reported Sudden Death) केली आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नेमकं काय झालं
शशिकुमार शेंडे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते या ठिकाणी सेवेत हजर होते. आज दुपारी त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. यामुळं खळबळ उडाली. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःला का संपविलं असावं, यावरून चर्चा सुरू झाल्या. अद्याप मृत्यूचं नेमकं कारण कळू शकल नाही. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याची पत्नीसुद्धा पोलीस सेवेतच आहे.
पोलीस दलात खळबळ
पोलीस मुख्यालयात तैनात असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा मृतदेह सापडला. यामुळं नागपूर पोलिसांत खळबळ उडाली. शशिकुमार यांनी आत्महत्या का केली, यावर आता तपास यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांची पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहे. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकूण त्यांच्या पत्नीलाही धक्काच बसला. पण, त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही.