त्याचा दुसऱ्या स्त्रीवर जीव जडला, मग संपत्तीसाठी पत्नीवर दबाव टाकू लागला, मुलगी संतापली अन्…

60 व्या वर्षी व्यक्तीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधातून पुढे जे घडले त्याची कुणीही कल्पना केली नसेल.

त्याचा दुसऱ्या स्त्रीवर जीव जडला, मग संपत्तीसाठी पत्नीवर दबाव टाकू लागला, मुलगी संतापली अन्...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 3:50 PM

नागपूर : नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. प्रेमाला वय नसते असं म्हणतात. एकदा प्रेमात पडला की प्रेमासाठी वाट्टेल ते करायला असतो. प्रेमप्रकरणातूनच नागपुरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. 60 वर्षाचा वृद्ध दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. मग आपल्या पत्नीवर सर्व मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी दबाव टाकत होता. यासाठी तो पत्नीला मारहाणही करत होता. अखेर वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मारेकऱ्याला अटक करताच धक्कादायक बाब उघड

नागपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या भिवापूर येथील पेट्रोल पंपावर 17 मे रोजी एका वृद्धाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास करत आधी मारेकऱ्याला पकडले. मारेकऱ्याची चौकशी केली असता सर्व धक्कदायक प्रकार उघडकीस आला.

मुलीनेच सुपारी देऊन बापाला संपवले

मयत वृद्धाचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध सुरु होते. यामुळे तो घरी पत्नी आणि मुलीशी दररोज भांडण करायचा. वृद्धाची सर्व मालमत्ता त्याच्या पत्नीच्या नावे होती. एक पेट्रोल पंप, एक शेत आणि घर हे सर्व आपल्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी वृद्ध इसम पत्नीवर दबाव टाकत होता. यातूनच त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. मालमत्तेवरुन 2 मे रोजीही वृद्धाचे पत्नी आणि मुलीशी भांडण झाले.

हे सुद्धा वाचा

रोजच्या त्रासाला कंटाळून मुलीने वडिलांना संपवण्याचा कट रचला. यासाी तिने एका गुंडाला 5 लाख रुपयांची सुपारी दिली. त्याप्रमाणे आरोपीने आपल्या साथीदारांसह पेट्रोल पंपाजवळ वृ्द्धावर हल्ला केला. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत हत्याकांडाचा उलगडा केला. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.