रात्री पत्नीला संपवले, दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑफिसमध्ये काम केले; पती-पत्नीत नेमके काय घडले?

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातून त्या दोघांंमध्ये वारंवार भांडण होत होते. या भांडणातून पतीने पत्नीसोबत भयंकर कृत्य केले.

रात्री पत्नीला संपवले, दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑफिसमध्ये काम केले; पती-पत्नीत नेमके काय घडले?
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:41 AM

नालासोपारा : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. नालासोपारा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. प्रभु विश्वकर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. तर अनिता विश्वकर्मा असे मयत पत्नीचे नाव आहे. पोलीस पतीची अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सात वर्षापूर्वी झाला होता विवाह

प्रभु विश्वकर्मा आणि अनिता विश्वकर्मा यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. दोघे नालासोपारा येथे राहत होते. प्रभु याला पत्नी अनिताचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याने याबाबत अनितालाही विचारले. तिने आपले कोणासोबतही अनैतिक संबंध नसल्याचे सांगितले.

चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये भांडण

मात्र तरीही प्रभुला विश्वास बसत नव्हता. तो वारंवार अनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. रविवारी रात्रीही दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की, विकोपाला गेला की प्रभुने अनिताचा गळा आवळून तिला संपवले.

हे सुद्धा वाचा

रात्री हत्या केली, सकाळी कामाला गेला

रात्री पत्नीची हत्या केली. मग सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेला. दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन संध्याकाळी घरी परतला. यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.