संशयाचे भूत डोक्यात शिरले, मग पत्नी आणि मुलाने जे केले त्याने जिल्हा हादरला !

पत्नीला आणि मुलाला पतीचे अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. याच संशयातून दररोज घरात वाद होत होते. अखेर हा वाद विकोपाला गेला अन् भयंकर घडलं.

संशयाचे भूत डोक्यात शिरले, मग पत्नी आणि मुलाने जे केले त्याने जिल्हा हादरला !
अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 12:03 PM

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : पतीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पत्नीने मुलाच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची धक्कदायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर भागात ही खळबळजनक घटना घडली. दादाजी पोपट गवळी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे. सुनीता गवळी आणि विशाल गवळी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस अधिक पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

दामोदर नगरमधील समृद्धी हाईट्समध्ये गवळी कुटुंब राहते. सुनीता गवळी यांना पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आपल्या वहिनीसोबत आपले पती दादाजी गवळी यांचे प्रेमसंबंध सुरु असल्याचे सुनीता यांना वाटायचे. याच संशयातून कुटुंबात दररोज वाद व्हायचे. याच संशयातून पत्नी आणि मुलाने पतीचा काटा काढण्याचे ठरवले.

पत्नी आणि मुलाला अटक

प्लाननुसार दादाजी हे गाढ झोपेत असताना सुनीता आणि विशाल यांनी त्यांना आधी गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न यशस्वी होत नसल्याने मुलाने पाय धरले आणि पत्नीने डोक्यात मुसळ घालून पतीची हत्या केली. घटनेची कुणकुण लागताच सोसायटीतील एका इसमाने इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पत्नी आणि मुलाला अटक करत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ संशयातून एक कुटुंब उद्धवस्त झाले.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.