घरगुती वाद टोकाला गेला, भाऊच भावाच्या जीवावर उठला; बसस्थानकात नेमके काय घडले?

भाऊबंदकीमध्ये कौटुंबिक वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी एक भाऊ चार-पाच नातेवाईकांसह दुसऱ्या भावाकडे आला. मात्र वाद मिटवण्याऐवजी भररस्त्यात जे घडले ते भयंकर होते.

घरगुती वाद टोकाला गेला, भाऊच भावाच्या जीवावर उठला; बसस्थानकात नेमके काय घडले?
कौटुंबिक वादातून भावाकडून भावावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 1:14 PM

नाशिक / चैतन्य गायकवाड : घरगुती वादातून भावानेच टरबूज विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील निमाणी बस स्थानकाजवळ ही घटना घडली. या घटनेत टरबूज विक्रेत्याचा कान तुटला. सोमनाथ भोसले असे 29 वर्षीय टरबूज विक्रेत्याचे नाव आहे. आधी सोमनाथच्या वडिलांवर आरोपींनी हल्ला केला, मग मध्यस्थी करायला आलेल्या सोमनाथवर हल्ला केला. या हल्ल्यात वडिलही जखमी झाले आहेत. जखमी सोमनाथ आणि त्याचे वडील आसाराम भोसले यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वादातून पिता-पुत्रावर हल्ला

सोमनाथ भोसले हा निमाणी बस स्थानकाच्या बाजूला टरबूज विक्रीचा व्यवसाय करतो. सोमनाथ हा गुरुवारी दुपारी आपल्या दुकानावर टरबूज विक्री करत असताना त्याचा भाऊ चेतन भोसले आणि त्याचे इतर चार-पाच नातेवाईक तेथे आले. चेतन भोसले आणि सोमनाथ भोसले यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. हा वाद मिटवण्यासाठी सर्वजण तेथे आले होते. मात्र वाद मिटण्याऐवजी वाद पुन्हा सुरु झाला.

जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

सर्व आरोपींनी सोमनाथ भोसले याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी सोमनाथच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी सोमनाथ मध्यस्थी करायला गेला असता आरोपींनी त्याच्यावरही हल्ला केला. यात त्याचा उजवा कान तुटला. जखमी पिता-पुत्रांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.