मध्यरात्री तलवारी आणि दांडके घेऊन येतात…घरावर दगड फेक करत हैदोस घालणाऱ्या टोळीचा बंदोबस्त कधी होणार?

परिसरातील घरांवर दगडफेक करतांना पंधरा ते वीस लोक दिसून येत आहे. काहींच्या हातात लाकडी दांडके आणि काहींच्या हातात धारदार हत्यारे असल्याचे दिसून येत आहे.

मध्यरात्री तलवारी आणि दांडके घेऊन येतात...घरावर दगड फेक करत हैदोस घालणाऱ्या टोळीचा बंदोबस्त कधी होणार?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 5:56 PM

नाशिक : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने (Crime) चांगलच डोकं वर काढले आहे. बलात्कार (Rape) आणि खुनाच्या (Murder) घटनेने शहर हादरलेलं असतांना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकच्या अंबड परिसरातील दत्तनगर आणि दातीर मळा परिसरात एक टोळी सध्या दहशत माजवत आहे. घरांवर दगडफेक करत हातात लाकडी दांडके आणि तलवारी घेऊन कुठलीही भीती न बाळगता वावरत आहे. या घटनेचा तेथील नागरिकांनीच व्हिडिओ काढून सोशल मिडियावर व्हायरल करत या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर तसेच दातीर मळा परिसरात टवाळ खोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमधून प्रथम दर्शनी समोर येत आहे.

परिसरातील घरांवर दगडफेक करतांना पंधरा ते वीस लोक दिसून येत आहे. काहींच्या हातात लाकडी दांडके आणि काहींच्या हातात धारदार हत्यारे असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्तनगर परिसर, दातीर मळा आणि अंबड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

परिसरात टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करत तेथील नागरिक या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी देखील असेच व्हिडिओ यापूर्वी समोर आलेले आहे, त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक तरुण आढळून आलेले आहे.

नवीन नाशिक परिसरात अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा ट्रेंड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, पोलीसांनी अशा टोळीचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.