नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल
बँक मॅनेजरने जादा व्याजाचे आमिष दाखवून ग्राहकाचे 14 लाख रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकः बँक मॅनेजरने जादा व्याजाचे आमिष दाखवून ग्राहकाचे 14 लाख रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आडगाव येथील राजेंद्र देवराम जाधव (वय 60) यांचे अॅक्सीस बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्यावर मोठी रक्कम होती. याची माहिती बँक मॅनेजर अमित दिलीप कुलकर्णी (रा. पार्वतीनगर, पिंटो कॉलनी, जुना सायखेडा रोड, दसक) याला होती. त्याने राजेंद्र जाधव यांना फोन करून बँकेत बोलावून घेतले. त्यांना बँकेपेक्षा जादा व्याजाचे आमीष दाखवले. त्यासाठी त्यांच्या खात्यातील रक्कम दुसरीकडे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यापोटी जाधव यांच्याकडून त्याने त्यांच्या सह्याचे धनादेश घेतले. जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्याने वेळोवरी 13 लाख 80300 रुपये काढून घेतले. मात्र, जाधव यांना पुन्हा पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जाधव यांचे व्याज तर बुडालेच, सोबत बँकेतली बचत म्हणून ठेवलेली रक्कमही मॅनेजरने हडपली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेच.
तीन दुचाकींची चोरी
नाशिक जिल्ह्यात तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत कैलास नगर, नांदुर नाका, निलगिरी बाग नाशिक येथील सागर प्रकाश सोळले यांची मोटारसायकल चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी अंबड येथील यादव नारायण जाधव यांची पल्सर गाडी लांबवली. अंबड, दत्तनगर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाधव गेले होते. मंदिराबाहेर लावलेली गाडी चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत गजानन प्रमाणिक यांची दुचाकी सिंहस्थनगर, सिडको, नाशिक येथून चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करणारी महिला ताब्यात
गेल्या अनेक दिवसांपासून म्हसरूळ परिसरात चोरी करणाऱ्या महिलेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलिसांनी या महिलांचा पाठलाग करत तिला अटक केली. दरम्यान, या महिलेची कसून चौकशी केली असता, पोलिसांकडे तिने आपण केलेले गुन्हे कबूल केले. दरम्यान, नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांनी या महिलेकडून एलईडी टीव्ही, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, घड्याळ,चांदीच्या वस्तू असा एकूण 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इतर बातम्याः
15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?
दिवाळीत बाईक घेण्याचा विचार करताय? रॉयल एनफील्डची ‘नवी रेन्ज’ सुस्साट धावणार; जाणून घ्या सबकुछ!https://t.co/qSZ7Xn8VSf#2021RoyalEnfield | #newlaunch |#RoyalEnfield
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021