हातावर ‘What I do?’ लिहून संपवले जीवन, अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत नेमके काय घडले?
एलेसच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. डहाणूच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत झरी परिसरात सध्या ज्ञानमाता आदिवली माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चालवले जाते. एलेस हा इयत्ता अकरावीत विज्ञान शिकत होता.
पालघर : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने शाळेच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झरी परिसरात असलेल्या ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत ही घटना घडली. एलेस विनय लखन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो या शाळेत इयत्ता अकरावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थ्याने हातावर ‘What I do?’ लिहिले होते. ही शाळा पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास योजनेंतर्गत चालवली जाते.
आज एलेसचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एलेस हा तलासरी तहसीलच्या सावरोली उधानपाडा येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यापूर्वी अॅलिसने त्याच्या हातावर लिहिले होते – ‘एलेस डेथ अँड व्हॉट आय डू?’
प्रेमप्रकरणातून निराशेने उचलले हे पाऊल?
घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास आणि चौकशी सुरू केली. प्रेमप्रकरणातून निराश होऊन एलेसने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एलेसच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. डहाणूच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत झरी परिसरात सध्या ज्ञानमाता आदिवली माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चालवले जाते. एलेस हा इयत्ता अकरावीत विज्ञान शिकत होता.
प्रेमप्रकरणातून निराश होऊन एलेस हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले. मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासाअंतीच एलेसच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येईल.