पत्नीसोबत रोजच्या वादाला कंटाळला होता, भाऊ म्हणाला विषय संपव, मग पतीने थेट…

पतीला पत्नीचे अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर हा वाद टोकाला गेला आणि भयंकर घटना घडली.

पत्नीसोबत रोजच्या वादाला कंटाळला होता, भाऊ म्हणाला विषय संपव, मग पतीने थेट...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 2:52 PM

धौलपूर : पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. पतीने भावाला आपल्या वादाबाबत सांगितले. भावाने पत्नी आणि मुलीची हत्या करण्यासाठी पतीला प्रवृत्त केले. मग पतीने पत्नीसह 10 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सीमा असे मयत पत्नीचे नाव आहे, तर बनवारी लाल असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी सीमाचा भाऊ नरेंद्र सिंह याने दिलेल्या तक्रारीवरुन बनवारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. भावाच्या सल्ल्यामुळे एक संसार उद्धवस्त झाला आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नीचे आपल्या वडिलांसोबत अनैतिक संबंध होते, असा दावा आरोपीने केला आहे. यामुळे पत्नी आणि त्याच्यामध्ये वाद होते. ही बाब बनवारीने आपला चुलत भाऊ केदारला याबाबत सांगितले. चुलत भावाने त्याला पत्नी आणि मुलीला संपवण्याचा सल्ला दिला. यानंतर केदारनेच बनवारीला देशी कट्टा आणि जिवंत काडतूस आणून दिले. बनवारीने देशी कट्ट्याने गोळी झाडून पत्नी आणि मुलीला संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन पतीविरोधात गुन्हा दाखल करत पतीला अटक केली. मात्र हत्येचा मास्टर माईंड केदार सिंह फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत रविवारी त्याला राजाखेडा बायपासवरुन अटक केली आहे. मयत महिलेचे खरंच सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते का याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासाअंती सत्य उजेडात यईल.

हे सुद्धा वाचा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.