3 मे ला त्याचा विवाह होणार होता, पण त्याआधीच जे घडले त्याने सर्वच गावच हादरला !

त्याचे लग्न ठरले होते म्हणून तो गावी आला होता. पण अचानक घरातून गायब झाला. कुटुंबासह गावकरीही त्याचा कसून शोध घेत होते. पण तो काही सापडला नाही. मग जे समोर आले त्यानंतर सर्वच हादरले.

3 मे ला त्याचा विवाह होणार होता, पण त्याआधीच जे घडले त्याने सर्वच गावच हादरला !
बेपत्ता तरुणाचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 10:17 PM

झालावाड : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी जयपूरहून आपल्या गावी आलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळल्याने झालावाड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तरुणाचा मृतदेह दुसऱ्या गावातील विहिरीत आढळला. त्यामुळे तरुणांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. लग्नाला अवघे दहा दिवस बाकी असतानाच हा प्रकार घडला आहे. रणजीत राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. तरुणाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या आरोपावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाचे 3 मे रोजी होणार होते लग्न

मयत तरुणाचे 3 मे रोजी लग्न होणार होते. तरुणाच्या घरामध्ये लगीनघाई सुरू होती. रणजीत हा जयपुरमध्ये चांगल्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या इच्छेनुसार वधू देखील मिळाली होती. सर्व नातेवाईकही त्याच्या लग्नाच्या तयारीत होते. याचदरम्यान अचानक रणजीतच्या मृत्यूची बातमी धडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रणजीत हा मंगळवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता.

मागील तीन दिवसांपासून त्याचे कुटुंबीय तसेच गावकरी त्याचा सर्वत्र शोध घेत होते. आज सकाळी सारोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनोडा गावाजवळील एका विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. तेथील स्थानिक गावकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून तो रणजीतचा असल्याची ओळख पटवली.

हे सुद्धा वाचा

नातेवाईकांनी मारेकऱ्यांच्या अटकेची केली मागणी

रणजीतला अज्ञात मारेकर्‍यांनी जीवे मारून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून अज्ञात मारेकऱ्यांना अटक करावी, अशी आग्रही मागणी रणजीतच्या नातेवाईकांनी केली. याच मागणीवर अडून बसलेल्या नातेवाईकांनी रणजीतचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासही अटकाव केला होता.

यादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिरंजीलाल मीना घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर रणजीतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.