उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेला, मग मुलाने बापासोबत जे केले ते पाहून संताप अनावर होईल !
पैशाच्या वाद टोकाला गेला. मग मुलाने जन्मदात्या पित्यासोबत जे केले ते भयंकर होतं. या घटनेमुळे बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासला आहे.
![उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेला, मग मुलाने बापासोबत जे केले ते पाहून संताप अनावर होईल ! उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेला, मग मुलाने बापासोबत जे केले ते पाहून संताप अनावर होईल !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/24204355/sangli-murder-1.jpg?w=1280)
सांगली : मिरज तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उसने दिलेले पैसे परत मागायला गेलेल्या बापाची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. बेडग स्टेशन रोड मलगाव या ठिकाणी आज ही दुर्दैवी घटना घडली. बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मुलाने त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. बापाची हत्या केल्यानंतर नराधम मुलगा घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. दाजी उर्फ दादू गणपती आकळे उर्फ उप्पार असे मयत पित्याचे नाव आहे.
वाद विकोपाला गेला अन् मुलाने ट्रॅक्टरच अंगावर घातला
दादू आकळे यांनी मुलगा लक्ष्मण आकळे याला 80 हजार रुपये उसने दिले होते. मात्र मुलगा ते पैसे परत देत नव्हता. दादू हे मुलाकडे उसने दिलेले पैसे परत घेण्यासाठी गेला होते. यावेळी बाप-लेकात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि मुलाने बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून वडिलांची हत्या केली. यानंतर लक्ष्मण घटनास्थळाहून फरार झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस फरार मुलाचा शोध घेत आहेत.