टेंभुर्णीत काँग्रेसच्या शहराध्यक्षाने तिघांवर केला प्राणघातक हल्ला, मारहाणीचे सीसीटिव्ही फुटेज tv9च्या हाती
जखमींना रूग्णालयात दाखल केले असताना तेथेही शहराध्यक्ष कदम यांच्यासह 6 जणांनी धुडगूस घातला. तसेच त्यांनी लोखंडी गज घेऊन रूग्णालयात नंगानाच केल्याचे cctv फुटेज tv9 मराठीच्या हाती लागले आहेत.
टेंभुर्णी (संदिप शिंदे) : राजकीय वरदहस्त असला की आपण काहीही करू शकतो असे अनेक नेत्यांना वाटतं असते. तर सत्तेच्या उन्माद डोक्यात गेला की त्याचा त्रास हा होतोच. असाच काही उन्माद टेंभुर्णी येथे काँग्रेसच्या शहराध्यक्षाने माजवल्याचे सीसीटिव्ही फुटेजवरून समोर आले आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे काँग्रेसच्या शहराध्यक्षाने भावकीतील वादातुन तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे टेंभुर्णीसह (Tembhurni) माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान प्राणघातक हल्ला (assault) केल्या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ कदम (City President Somnath Kadam) यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्यामधील वाद उफाळून आला
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे काँग्रेसच्या शहराध्यक्ष सोमनाथ कदम आणि भावकीतील काही शेतकऱ्यांच्यामधील वाद आज उफाळून आला. यामुळे शहराध्यक्ष कदम यांच्यासह 6 जणांनी भावकीतील काही शेतकऱ्यांना मारहान केली. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल केले असताना तेथेही शहराध्यक्ष कदम यांच्यासह 6 जणांनी धुडगूस घातला. तसेच त्यांनी लोखंडी गज घेऊन रूग्णालयात नंगानाच केल्याचे cctv फुटेज tv9 मराठीच्या हाती लागले आहेत. ज्यामुळे टेंभुर्णीसह माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रूग्णालयात ही हल्ला
दरम्यान आता काही दिवसांवरच राज्यातील महानगारपालिकांच्या निवडणूकांचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्षांमुध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे राजकारण गावपातळीवर देखील तापलेले आहे. तर निवडणूका शहरातील महानगरपालिकांसाठी असल्याने राजकीय पक्ष आता पासूनच आपला प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यानच माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे काँग्रेसच्या शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांनी तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याने टेंभुर्णीसह माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर शहराध्यक्ष कदम यांनी रूग्णालयात ही हल्ला केल्याचे cctv फुटेजमधून उघड होत आहे. तर तिघांवर प्राणघातक हल्ला करताना त्यांनी आणि इतर सहा जनांनी हॉस्पिटल मधील साहित्याचेही नुकसान केले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष कदम यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच जखमी शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.