ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत ‘या’ तीन गावांनी जामताराला देखील सोडले मागे, यांचा प्लॅन आहे सर्वात हटके!

नेटफ्लिक्सवर गाजत असलेली जामतारा वेब्सिरीज अनेकांनी पहिली असेल, पण त्यापेक्षाही धक्कादायक ठगबाजी या गावांमध्ये चालते

ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत 'या' तीन गावांनी जामताराला देखील सोडले मागे, यांचा प्लॅन आहे सर्वात हटके!
ऑनलाईन फ्रॉडImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 8:37 PM

भोपाळ, नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली जामतारा (Jamtara) नावाची वेब सिरीज खूपच गाजत आहे. ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणे हा  पूर्ण गावाचाच मुख्य व्यवसाय असल्याचे यामध्ये दाखविण्यात आलेले आहे. मात्र  हरियाणा, यूपी आणि राजस्थानच्या ठगीनीं  जामतारा टोळीला देखील यामध्ये मागे टाकल्याचे समोर आले आहे. भोपाळसह मध्यप्रदेशातील विविध शहरांमध्ये या तीन राज्यातील ठग सक्रिय असून ते ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करतात. राजधानीच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या अटकेतून हे उघड झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी सात टोळ्यांतील 23 ठगबाजांना अटक केली आहे. बहुतांश आरोपी हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील आहेत.

अलवर, भरतपूर आणि मेवातचे ठग सक्रिय

यापूर्वीही सायबर पोलिसांनी नोकरीच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून फसवणूक करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक केली होती. या सेक्सटोर्शन टोळीतील सदस्य राजस्थानमधील अलवर, भरतपूर आणि हरियाणातील मेवात येथील असून, त्यांची फसवणूक करण्याची पद्धत वेगळीच आहे. हे ठगबाज आधी तरुणीचा फोटो व्हाट्स ॲपवर टाकतात. त्यानंतर फोनवर अश्लील संभाषण करतात आणि ते संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात. याशिवाय तरुणींसीबतचे अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात आणि नंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतात.

जामतारा गँग करतात ओटीपी मागून फसवणूक

जामतारा टोळीचे लोक बहुतांश बँकेशी संबंधित फसवणूक करतात, अशी माहिती आरोपींनी चौकशीदरम्यान दिली. म्हणजेच ते OTP मागून फसवणूक करतात, पण कालांतराने लोकांमध्ये जागृती आली आणि त्यांनी OTP देणे बंद केले.

हे सुद्धा वाचा

सेक्सटॉर्शन प्रकरणात फसवणूक झालेले समोर यायला घाबरतात

OTP बद्दल आता अनेकांमध्ये सजगता आली आहे, त्यामुळे ठगबाजांनी आता सेक्सटॉरशनचा विकृत पर्याय निवडला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात ब्लॅकमेल होणारे पोलिसात तक्रारही करत नाहीत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.