CCTV Video : उल्हासनगरात मोलकरणीने घरातून लंपास केले 12 लाख रुपये!, चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कैलास मोहानी यांनी मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करून कपाटात 12 लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. याची चाहूल सुरेखा जाधवला लागली. घरी कुणी नसताना तिने कपाट उघडून त्यातले 12 लाख रुपये लंपास केले.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेने मालकाच्या घरातून 12 लाख रुपयांची रोख (Cash) रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक (Arrest) केले आहे. सुरेखा जाधव असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. हिललाईन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. महिलेने हे कशासाठी चोरले याबाबत महिलेची चौकशी सुरु आहे.
उल्हासनगरमध्ये मोलकरणीनेच मालकाचे 12 लाख लुटले, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद#UlhasnagarCrime #CashTheft #CCTV #Maid pic.twitter.com/FdB3ZQokXF
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2022
घरमालकाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे मोलकरणीने चोरले
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील गणेश नगर परिसरात अमित महल इमारतीत कैलास मोहानी राहतात. त्यांचा मार्बल विक्रीचा व्यवसाय आहे. याच परिसरात राहणारी सुरेखा जाधव ही महिला त्यांच्याकडे घर काम करते. कैलास मोहानी यांनी मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करून कपाटात 12 लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. याची चाहूल सुरेखा जाधवला लागली. घरी कुणी नसताना तिने कपाट उघडून त्यातले 12 लाख रुपये लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत कैलास मोहानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी चोरी करणारी मोलकरीण सुरेखा जाधवविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.
बुलढाण्यात ज्वेलर्स मालकाला लुटणारे दोघे अटकेत
बुलढाण्यात दुकान बंद करुन घरी जात असताना ज्वेलर्स मालकाच्या बाईकला कारने धडक देत लुटणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केले आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. राजेश प्रमोद वाटाणे असे लुटण्यात आलेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव आहे. वाटाणे यांचे बाळापूर येथे सोन्या-चांदीचे दुकान असून, 9 ऑगस्टला रात्री दुकान बंद करुन दुचाकीने दागिने घेऊन घरी जात असताना ही घटना घडली. चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग घेऊन पोबारा केला. बॅगेमध्ये जवळपास 1 लाख 48 हजार 500 रूपयांचे दागिने होते. पवन भाऊराव शेगोकार आणि मंगेश सुखलाल ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (In Ulhasnagar, a maid looted and stole Rs 12 lakh, incident caught in cctv)