अंघोळीला जाण्यावरुन दोन भावांमध्ये वाद, मग लहान भावाने मोठ्याला थेट…

अंघोळीला जाण्यावरुन काकी आणि पुतणीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोघा काकांनी यात उडी घेतली. त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं.

अंघोळीला जाण्यावरुन दोन भावांमध्ये वाद, मग लहान भावाने मोठ्याला थेट...
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 7:04 PM

मोरादाबाद : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंघोळीला आधी कोण जाणार या कारणावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेली लहान भावाने मोठ्या भावाची हत्याच केली. तर वहिनी आणि तीन पुतण्या जखमी झाल्या आहेत. भावाची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. फकीर हुसैन असे मयत भावाचे नाव आहे. तर शादाब असे आरोपी लहान भावाचे नाव आहे. पोलिसांनी शादाब आणि त्याच्या अन्य भावाला अटक केली आहे. या घटनेत आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता असून, पोलीस अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

अंघोळीवरुन काकी-पुतणीमध्ये वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब आणि फकीरसह ते एकूण पाच भाऊ आहेत. त्यापैकी तीन विवाहित आणि दोन अविवाहित आहेत. पाचही जण दुमजली घरात राहतात. तळमजल्यावर मोठा भाऊ आपल्या कुटुंबासह राहतो, तर वरच्या मजल्यावर अन्य चार भाऊ राहतात. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फकीरची मुलगी अंघोळीला चालली होती. यावेळी फकीरचा भाऊ साजिदच्या पत्नी आली. तिने फकीरच्या मुलीला आधी मी जाते, मग तू जा असे सांगितले.

वादातून भावाची मारहाण करत हत्या

यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. यानंतर शादाब आणि साजिद खाली आले आणि वाद वाढत गेला. त्यांनी भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फकीर लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यावेळी त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या पत्नीलाही आरोपींनी मारहाण केली. तर मुली कशाबशा आपला जीव वाचवून बाहेर पळाल्या. त्यामुळे त्यांना किरकोळ जखमा झाल्या. फकीरचा मारहाणीत मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

फकीरच्या मेव्हण्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे. यात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.