Terrible : स्मशानात जळत असलेल्या चितेवरील मृतदेहाचे जळते मुंडकं खेचून घरी नेले; UP मधील धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. येथे एका व्यक्तीने स्मशानभूमीतील जळत्या चितेचे शीर बाहेर काढले आणि ते आपल्या घरी नेले. हा व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन मित्र देखील होते. ज्या व्यक्तीचा हा मृतदेह होता त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक करून मुंडकं जप्त केले.
शाहजहांपूर : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा काही नेम नाही दारूच्या नशेत अनेक जण भांडण काढतात, शिव्या देतात, मारहाण करतात तर काही जण अनेकांना उपद्रवी ठरेल असं कृत्य करतात. मात्र उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) एका बेवड्याने(drunkard ) अत्यंत धक्कादायक कृत्य केले आहे. स्मशानात जळत असलेल्या चितेवरील मृतदेहाचे जळते मुंडकं बाहेर काढले आणि त्याच्या घरी नेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन मुंडके ताब्यात घेतले. या व्यक्तीला देखील पोलिसांनी अटक केली. त्याने हे मुंडकं कशासाठी घरी नेले? असा प्रश्न उपस्थित झाला असताना पोलीस तपासात यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
दारुच्या नशेत केले भयानक कृत्य
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. येथे एका व्यक्तीने स्मशानभूमीतील जळत्या चितेचे शीर बाहेर काढले आणि ते आपल्या घरी नेले. हा व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन मित्र देखील होते. ज्या व्यक्तीचा हा मृतदेह होता त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक करून मुंडकं जप्त केले.
चितेवरील लाकडं बाजूला करुन मृतदेहाचे फक्त शीर काढून नेले
मृत व्यक्ती आणि ज्याने या मृतदेहाचे मुंडक नेले ते दोघेही तिल्हारच्या पिपरौली गावचे रहिवासी आहेत. कुबेर गंगवार (वय 60) यांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेहाला अग्नी दिल्यावर थोड्यावेळाने कुटूंबिय घरी निघून गले. यानंतर उपेंद्र उर्फ गोपी नावाचा तरुण दारूच्या नशेत स्मशानात आला. त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. या तिघांनी चितेची लाकडे काढून कुबेर गंगवारचे शीर बाहेर काढले. यानंतर गोपीने हे मुंडकं घरी गेले.
तंत्रविद्येसाठी वापरणार होता शीर
गावातील काही लोकांनी त्याला हे करताना पाहिले होते. यानंतर कुबेरच्या कुटुंबासह गावातील सर्व लोक जमा झाले आणि उपेंद्रच्या घरी पोहोचले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. उपेंद्रच्या आईने मुलगा घरात नाही असे जमावाला सांगितले. यानंतर जमावाने घरात घुसण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी आरोपी उपेंद्रला पकडले. त्याच्या घरातून शीर हस्तगत करुन ते मृत किटुंबीयाच्या ताब्यात दिले. उपेंद्रचा मित्र तंत्रविद्या करतो. यासाठी त्याने चितेतून शीर काढले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.