दारुच्या व्यसनाला कंटाळून तांत्रिकाच्या मदतीने पतीला संपवले, मग अपघाती मृत्यू दर्शवण्याचा प्रयत्न; पण…

तांत्रिकाने आपल्या चार सहकाऱ्यांसह सुरजितला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावले. मग त्याचे अपहरण करुन त्याची बरेली येथे नेऊन हत्या केली. हत्या केल्यानंतर अपघाती मृत्यू दर्शवण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्र्रॅकवर फेकला.

दारुच्या व्यसनाला कंटाळून तांत्रिकाच्या मदतीने पतीला संपवले, मग अपघाती मृत्यू दर्शवण्याचा प्रयत्न; पण...
दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 3:34 PM

शाहजहापूर : पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच जाऊबाईसोबत मिळून पतीला तांत्रिकाच्या मदतीने संपवल्याची घटना उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव करत मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकला. काही दिवसांपूर्वी पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान हत्येचा खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह सहा आरोपींना अटक केली आहे. सुरजीत असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सुरजितला दारुचे व्यसन होते

सुरजीतला दारुचे व्यसन होते. त्यामुळे सर्व कमाई तो दारुवर खर्च करत असे. याच दरम्यान सुरजीतची पत्नी विमला आणि त्याच्या वहिनीची बरेलीतील तांत्रिक इरफानशी भेट झाली.

पती दारु सोडत नसल्यामुळे काटा काढला

इरफानने तंत्र-मंत्राच्या सहाय्याने दारुचे व्यसन दूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र सुरजितचे दारुचे व्यसन सुटतच नव्हते. यानंतर पत्नी विमला आणि वहिनीने तांत्रिकाला पतीला ठार मारण्याची सुपारी दिली. पतीची हत्या करण्यासाठी तांत्रिकाला 2 लाख रुपये देण्याचे ठरले.

हे सुद्धा वाचा

आधी अपहरण केले मग हत्या

तांत्रिकाने आपल्या चार सहकाऱ्यांसह सुरजितला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावले. मग त्याचे अपहरण करुन त्याची बरेली येथे नेऊन हत्या केली. हत्या केल्यानंतर अपघाती मृत्यू दर्शवण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्र्रॅकवर फेकला.

नातेवाईकांना संशय आल्याने प्रकरण उघड

यानंतर हत्येच्या सुपारीतील उरलेले पैसे घेण्यासाठी तांत्रिक विमलाकडे आल्यानंतर नातेवाईकांना संशय आला. नातेवाईकांनी तांत्रिकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तांत्रिकाची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

पोलिसांकडून सहा आरोपींना अटक

यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी सुरजित पत्नी, वहिनीसह सहा लोकांना अटक केली आहे. पतीचे दारुचे व्यसन सुटत नसल्याने पत्नीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तांत्रिकाच्या मदतीने तिने पतीला संपवले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.