पत्नी तासन्तास फोनवर गप्पा मारायची, पतीला हे खटकायचं, मग जे समोर आलं ते पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली !

पत्नी दररोज तासन्तास फोनवर बोलायची. पतीसह सासरच्यांना ते खटकायचे. पती नेहमी तिला फोनवर बोलण्याबाबत रोखायचा. अखेर रोजच्या वादातून पत्नीने भयंकर निर्णय घेतला.

पत्नी तासन्तास फोनवर गप्पा मारायची, पतीला हे खटकायचं, मग जे समोर आलं ते पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली !
फोनवर बोलण्यावरुन पती-पत्नीचा वाद टोकाला गेलाImage Credit source: Shutterstock
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 2:52 PM

रामपूर : फोनवर बोलण्यावरुन टोकायचा म्हणून संतापलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये घडली आहे. घटना उघड होताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी पत्नीसह एका आरोपीला अटक केली आहे. महिलेचा प्रियकर फरार आहे. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. हत्या करुन मृतदेह जंगलात फेकून दिला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. लाखन सिंह असे मयत पतीचे नाव आहे. कुसुम सिंह असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

कुसुमच्या पतीचे चार वर्षापूर्वी अपघातात निधन झाले होते. त्यानंतर तिचा दिर लाखन सिंहशी विवाह झाला. कुसुमचे लाखनचा मामेभाऊ प्रदीप भगतसोबत प्रेमसंबंध सुरु होते. कुसुम तासन्तास प्रदीपसोबत फोनवर बोलायची. कुसुमचं फोनवर बोलणं पती, सासू आणि दिराला खटकायचं. लाखन तिला नेहमी यावरुन टोकायचा. यामुळे कुसुमचा पतीवर राग होता. तिने प्रियकर प्रदीपसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

कुसुमचा प्रियकर भगतगिरी करायचा. प्लाननुसार त्याने लाखनला भगतगिरीच्या बहाण्याने बोलावले. मग त्याला पाण्यातून नशेचा पदार्थ मिसळून दिला. मग बिजनेस नामक तरुणासोबत मिळून प्रदीपने लाखनची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह जंगलात फेकला. पोलिसांना जंगलात 30 जून रोजी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी मयताची ओळख पटवत त्याच्या पत्नीच्या फियार्दीवरुन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना तपासादरम्यान कुसुचा लाखनसोबतचा दुसरा विवाह आणि प्रदीपसोबत प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. पोलिसांनी कुसुमला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता सर्व घटना उघड झाली. यानंतर पोलिसांनी कुसुम आणि बिजनेस या दोघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी प्रदीप अद्याप फरार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.