इन्स्टंट मॅरेजचं जग ? | लग्न केलं, लगेच 15 मिनिटात फारकत, पुढच्या 15 मिनिटात लगेच दुसऱ्यासोबत लग्न | एका तासात 2 वेळेस लग्न

एक तरुण आपल्या पत्नीला न सांगता चोरुन दुसरा विवाह करत होता. पण ऐन विवाह सोहळ्यात पहिली पत्नी हजर झाली आणि तरुणाचा दुसरा विवाह एक तासही टिकला नाही.

इन्स्टंट मॅरेजचं जग ? | लग्न केलं, लगेच 15 मिनिटात फारकत, पुढच्या 15 मिनिटात लगेच दुसऱ्यासोबत लग्न | एका तासात 2 वेळेस लग्न
अमानुष छळ करणाऱ्या पती आणि सासरच्यांविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात धावImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 10:17 PM

संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. मोठा भाऊ वरात घेऊन मुलीच्या दारात आला पण अखेर लहान भावासोबत संसार थाटल्याने हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. एक तरुण आपल्या पत्नीला न सांगता चोरुन दुसरा विवाह करत होता. पण ऐन विवाह सोहळ्यात पहिली पत्नी हजर झाली आणि तरुणाचा दुसरा विवाह एक तासही टिकला नाही. अखेर नववधूचा विवाह तरुणाच्या लहान भावाशी करुन देण्यात आला.

तरुणाचा पहिला विवाह झाला होता

सैदनगली येथील एका तरुणाचा त्याच गावातील तरुणीशी पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती. याच दरम्यान तरुणाने गुपचूप दबोई खुर्द गावातील तरुणीशी दुसरा विवाह ठरवला.

पतीचा दुसरा विवाह पार पडताच पहिली पत्नी मुलांसह हजर झाली

तरुण वाजतगाजत वधूच्या घरी वरात घेऊन गेला. वधूपक्षाकडून वरातीचे स्वागत करुन निकाहही पढण्यात आला. मात्र तरुणाचा दुसऱ्या विवाहाचा हा आनंद तासभरही टिकला नाही. तरुणाच्या या विवाहाबद्दल त्याच्या पहिल्या पत्नीला माहिती मिळाली आणि पहिली पत्नी मुलांसह लग्नमंडपात हजर झाली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात नेले

पहिली पत्नी आल्यानंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. महिलेने पोलिसांनाही पतीच्या दुसऱ्या विवाहाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी विवाहस्थळी धाव घेत दोन्ही पक्षाकडील लोकांना पोलीस ठाण्यात नेले.

भावाशी तलाक करत छोट्या भावाशी निकाह

यानंतर गावातील काही जबाबदार व्यक्तींनी पोलीस ठाण्यात दाखल होत प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पंचायतने दोन्ही पक्षांमध्ये समझोता करत नवविवाहित जोडप्याचा तलाक करण्यात आला. यानंतर पंचायतीच्या निर्णयानुसार तलाक झाल्यानंतर तरुणीचा तरुणाच्या लहान भावासोबत निकाह करण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.