‘तुमचा मुलगा बनून पुन्हा येईन पण लग्न करु नका’ म्हणत तरुणाने संपवले जीवन, कारण काय?
अमितचा विवाह 6 वर्षापूर्वी रचानासोबत झाला होता. दोघांना 4 वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर अमित आणि रचना यांच्यात वारंवार भांडण होत होते. घरातील रोजच्या भांडणामुळे अमितचे आई-वडील त्यांच्या मुलीकडे लखनौमध्ये रहायला गेले.
औरेया : पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये दिबियापूर कोतवाली परिसरात घडली आहे. अमित असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांच्या गैरहजेरीत अमितचे सासरचे लोक घरी यायचे आणि त्याचा छळ करत त्याला धमक्याही द्यायचे, असा आरोप आहे. पत्नी रचनानेही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले होते. वाढत्या त्रासाला कंटाळून अमितने अनेकवेळा आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्याला वाचवले.
अमित नैराश्येत होता. यावेळी आई-वडील घरात नसल्याची संधी साधत अमितने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अमितने वडिलांना अनेक व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवून आपले दुःख सांगितले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वृद्ध आईने एकच हंबरडा फोडला.
काय लिहिले होते मॅसेजमध्ये?
‘सॉरी पप्पा, माझी चूक नाही, तुम्हाला येथून हाकलून देऊनही हे लोक शांत होत नाहीत. रचनाची आई तुम्हा लोकांशी भांडण करण्याबद्दल बोलत होती. या सगळ्याचा मला दोन दिवसांपासून त्रास होत आहे. बाबा, उद्या हे लोक मला मारायला येणार आहेत.
आज दिवसभर मला घरातून हाकलून दिले आणि रात्री 9 वाजता आलो, त्यानंतर मला शिवीगाळ आणि आरोप करून जीवे मारण्याची धमकी दिली. हे लोक मला मारतील आणि तुम्हा लोकांना फसवण्याची धमकी देत आहेत. पप्पा माफ करा, आता मी तुटलो आहे.
सर्व दागिनेही ठेवले आहेत. तुम्ही लोक खूप चांगले आहात, मला पुन्हा तुमच्याकडे यायचे आहे. मात्र माझं लग्न करू नका.
आत्महत्या करण्यापूर्वी अमितने वडिलांना एकामागून एक अनेक व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. पीडित कुटुंबीय पोलिसांकडे आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी याचना करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहा वर्षांपूर्वी झाला होता विवाह
अमितचा विवाह 6 वर्षापूर्वी रचानासोबत झाला होता. दोघांना 4 वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर अमित आणि रचना यांच्यात वारंवार भांडण होत होते. घरातील रोजच्या भांडणामुळे अमितचे आई-वडील त्यांच्या मुलीकडे लखनौमध्ये रहायला गेले.
अमितच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे आई-वडील तात्काळ घरी पोहचले. तत्पूर्वीच अमितची पत्नी आणि तिचे आई-वडिल फरार झाले होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. सर्व बाबी तपासून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.