सासू सुना पोलिसांनाही आवरेना, आधी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; मग पोलीस ठाण्यातच दे धपाक…
पती-पत्नीमध्ये वाद होता म्हणून पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली. काही दिवसांनी पती मुलाला घेऊन आला म्हणून महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली. पण पोलीस पतीसोबत सासूही आली आणि पती बाजूलाच राहिली अन् भलतेच घडले.
ओरैया : उत्तर प्रदेशातील ओरैयामध्ये एक हैराण घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून सासू-सुना पोलीस ठाण्यातच एकमेकींना भिडल्याची घटना ओरैयामध्ये घडली आहे. सासू-सुनेने एकमेकीच्या झिंज्या उपटल्या, मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करत मोठ्या मुश्किलीने दोघींना शांत केले. कौटुंबिक वादातून तक्रार देण्यासाठी सून पोलीस ठाण्यात पोहचली. यानंतर पोलिसांनी मुलाला बोलावून घेतले असता सासूही मुलासोबत आली. सासू-सुना एकमेकींसमोर येताच एकमेकींना भिडल्या.
कौटुंबिक वादातून सून माहेरी राहत होती
ओरैया येथील बिधूना कोतवाली परिसरात ही घटना घडली. एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. या वादातून पत्नी आपल्या मुलाला घेऊन माहेरी राहत होती. मात्र काही दिवसापूर्वी तिचा पती मुलाला घेऊन आपल्या घरी आला. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सून आपल्या आईसोबत पोलीस ठाण्यात गेली.
सासूला पाहताच सुनेला संताप अनावर
सुनेने पोलिसांना सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी पतीसोबत महिलेची सासूही पोलीस ठाण्यात आली. सासूला पोलीस ठाण्यात पाहताच सुनेला राग अनावर झाला आणि ती सासूच्या अंगावर धावून गेली. यानंतर सुनेने सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली. मग दोघीही एकमेकींना भिडल्या.
पोलिसांनी दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघीही ऐकत नव्हत्या. मग मोठ्या मुश्किलीने दोघींना वेगळे केले. त्यानंतर दोघींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंद केली आहे. घरगुती वाद असल्याने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेत प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले.