AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक ! पत्नी आत्महत्या करत होती, पती व्हिडिओ बनवत होता; कारण काय?

कानपूरमधील किदवई नगर येथील शोभिता हिचा गुलमोहर नगरमध्ये राहणाऱ्या संजीवसोबत 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. शोभिताने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले हे कळू शकले नाही.

संतापजनक ! पत्नी आत्महत्या करत होती, पती व्हिडिओ बनवत होता; कारण काय?
संपत्तीसाठी पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारीImage Credit source: Google
| Updated on: Oct 26, 2022 | 3:47 PM
Share

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur Uttar Pradesh) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नी पंख्याला गळफास घेत आत्महत्या (Suicide) करत होती. यावेळी पतीने तिला वाचवायचे सोडून आत्महत्येचा व्हिडिओ करत (Shoot Suicide Video) होता. पतीचे कारनामे ऐकून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. शोभिता गुप्ता असे मयत पत्नीचे नाव आहे, तर संजीव गुप्ता असे व्हिडिओ काढणाऱ्या पतीचे नाव आहे.

4 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह

कानपूरमधील किदवई नगर येथील शोभिता हिचा गुलमोहर नगरमध्ये राहणाऱ्या संजीवसोबत 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. शोभिताने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले हे कळू शकले नाही.

पत्नी गळफास घेत होती पती व्हिडिओ बनवत होता

मंगळवारी दुपारी शोभिताने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी तिचा पती संजीवही तेथे उपस्थित होता. मात्र त्याने पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पत्नीचा आत्महत्या करताना व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवला.

पत्नीच्या आत्महत्येनंतर तिच्या घरच्यांना कळवले

शोभिताने आत्महत्या केल्यानंतर संजीवने याची माहिती तिच्या घरच्यांना दिली. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळतात शोभिताचे घरचे तिच्या घरी दाखल झाले. माहेरचे लोक घरी आले तेव्हा संजीव पत्नीला रुग्णालयात नेण्याऐवजी तिथेच तिला पंपिंग करत होता, असे महिलेच्या वडिलांनी सांगितले.

शोभिताच्या माहेरच्यांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नातेवाईकांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पत्नीच्या घरच्यांना आत्महत्या करतानाचा व्हिडिओ दाखवला

मुलीच्या घरी पोहताच वडिलांनी हे कसे घडले असे जावयाला विचारले. तेव्हा जावयाने मोबाईलमधील आत्महत्या करतानाचा व्हिडिओ तिच्या घरच्यांना दाखवला. व्हिडिओ पाहून महिलेच्या घरचे हैराण झाले.

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. शोभिताने कोणत्या कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पोलीस कसून तपास करत आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.