प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता, मग अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या साथीने घरच्यांनाच…

'त्या' दिवशी नेहमीप्रमाणे सर्व रात्री जेवले. मग दूध पिऊन झोपी गेले. जेव्हा झोपेतून जाग आली तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता, मग अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या साथीने घरच्यांनाच...
प्रेमाला विरोध करणाऱ्या भावाला प्रियकराच्या मदतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 10:40 PM

हरिद्वार : प्रेमप्रकरणातून उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एक भयानक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाला विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना दूधातून झोपेच्या गोळ्या देऊन सख्या भावाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. स्वार्थापोटी तरुणीने अख्ख कुटुंब उद्धवस्त केलं. धाधेकी धन्ना लक्सर जिल्हा हरिद्वार येथे ही घटना घडली. राहुल आणि कृष्णा अशी अटक आरोपींची नावे आहेत. राहुल आणि त्याचा मित्र कृष्णा हे मुलीच्या गावातील रहिवासी आहेत.

हरिद्वार पोलिसांकडे धन्ना लक्सर गावातील रहिवासी सेठपाल यांनी 10 फेब्रुवारी रोजी एक तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लक्सर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचे कुटुंबीय अचानक काही मिनिटांच्या अंतराने एक एक करून झोपी गेले. याआधी घरात असे कधीच घडले नव्हते. दरम्यान, त्यांचा मुलगा कुलवीर उर्फ ​​शेर सिंग हा संशयास्पदरित्या बेपत्ता झाला.

कुलवीरच्या अपहरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक खुलासा

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कोतवाली लक्सर पोलिसांनी भादंवि कलम 365, 139/23 अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अपहृत तरुण कुलवीरचा शोध सुरू केला. यावेली तपासादरम्यान अपहरण झालेल्या कुलवीरच्या बहिणीचे शेजारच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. यावरुन अपहरण झालेल्या कुलवीरचे त्याची बहीण आणि तिचा प्रियकर राहुलसोबत अनेकदा वाद झाले होते.

हे सुद्धा वाचा

या माहितीच्या आधारे अपहृत कुलवीरच्या अल्पवयीन बहिणीची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत मुलीने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. शेजारी राहणाऱ्या राहुलसोबत मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघांनाही कुलवीरने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने तो तिला सतत मारहाण करत होता. शिवाय राहुलचेही कुलवीर याच्याशी अनेकदा भांडण झाले होते. यानंतर प्रेमसंबंधात काटा ठरणाऱ्या मुलीने प्रियकर राहुल आणि त्याच्या मित्रासोबत भावाची हत्येचा कट रचला.

‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

मुलीने 6 फेब्रुवारी रोजी रात्री प्रियकराने दिलेल्या झोपेच्या गोळ्या दूधात टाकून सर्व कुटुंबाला दिल्या. दूध प्यायल्यानंतर सर्वजण बेशुद्ध झाले. मग मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने कुलवीरचा दोरीने गळा दाबून खून केला. त्यानंतर कुलवीरचा मृतदेह राहुलच्या गोठ्यात खड्डा खणून पुरण्यात आला. कुटुंबीयांची आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलीने स्वतः देखील कमी प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलवीर याचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी राहुल आणि त्याचा मित्र कृष्णा यांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. तर मुख्य सूत्रधार मुलीचीही चौकशी सुरू आहे.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.