पतीच्या मनात संशयाचा कीडा घुसला, रागाच्या भरात पतीने जे केले ते पाहून पोलीसही हैराण झाले !

पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरु होता. पण अचानक पतीच्या डोक्यात नको ते यायला लागले. मग हळूहळू या संसारात वादाची ठिणगी पडू लागली. अखेर जे घडायला नको होते तेच घडले.

पतीच्या मनात संशयाचा कीडा घुसला, रागाच्या भरात पतीने जे केले ते पाहून पोलीसही हैराण झाले !
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 5:23 PM

हरिद्वार : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला क्रूर पद्धतीने संपवल्याची घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये घडली. पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीने जे केले ते पाहून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत आणि ती रोज सेक्स चॅट करते असा पतीला संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये दररोज भांडण होत होते. अखेर पतीने पत्नीची हत्या करत या भांडणाला कायमची तिलांजली दिली. जगतपाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली हत्यारं जप्त केली आहेत.

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवले

जगतपाल हा गाजीवाला गावात राहणारा आपली पत्नी राधिकासह भाड्याच्या खोलीत राहत होता. जगतपालला सतत पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. तसेच आपली पत्नी सेक्स चॅट करते असेही त्याला वाटत होते. याच संशयातून त्याचा पत्नीवरील राग दिवसेंदिवस वाढत होता. याच रागातून त्याने पत्नीची क्रूर हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर तो यूपीतील बरेली येथे पळून गेला आणि काही घडलेच नाही या आविर्भावात राहत होता.

घरमालकीण घरी आल्यानंतर हत्येचा उलगडा

घरमालकीण रात्री उशिरा घरी परतल्यानंतर राधिकाच्या हत्येचा उलगडा झाला. यानंतर मालकिणीने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. मालकिणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस करत तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला बरेलीतून अटक केली.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.