Wardha Accident | वर्ध्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर हजारो कोंबड्यांचाही बळी
कान्हापूर शिवारात सोळा चाकी ट्रक मिनी ट्रकवर धडकला. सोळा चाकी ट्रक हा सोयाबीन घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. मिनी ट्रकमध्ये कोंबड्या होत्या. मोठ्या ट्रकने मागून मिनी ट्रकला धडक दिली. यात सोयाबीन खाली पडले. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
वर्धा : जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कान्हापूर (Kanhapur in Selu taluka) शिवारात सोळा चाकांच्या एक ट्रॅक दुसऱ्या मिनी ट्रॅकवर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. मिनी ट्रकमधील हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रुई (वाई)चा रवी रामनाथ सहारे (Ravi Ramnath Sahare) (वय 35) असे मृतकाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही भरधाव ट्रक रस्त्यावर थेट आडवे झाले. मिनी ट्रकमधील हजारो कोंबड्यांचाही यात बळी गेला. वर्ध्याहून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा सोळा चाकांचा ट्रक कोंबड्या घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकवर मागून जोरात आदळला. या अपघातात मिनी ट्रक हा थेट रस्ता दुभाजकावर आडवा झाला. त्यातील हजारो कोंबड्या या धडकेत मृत्यूमुखी पडल्यात.
असा झाला अपघात
कान्हापूर शिवारात सोळा चाकी ट्रक मिनी ट्रकवर धडकला. सोळा चाकी ट्रक हा सोयाबीन घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. मिनी ट्रकमध्ये कोंबड्या होत्या. मोठ्या ट्रकने मागून मिनी ट्रकला धडक दिली. यात सोयाबीन खाली पडले. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बऱ्याचशा कोंबड्याही मरण पावल्या. मिनी ट्रक दुभाजकावर आदळला. कोंबड्या रस्त्यावर पडून होत्या.
जखमी सेवाग्राम रुग्णालयात
धडक एवढी भीषण होती की यातील काही कोंबड्या गाडीबाहेर पडून रस्त्यावर विखुरल्या होत्या. तर दुसरीकडे धडक देणारा ट्रक सुद्धा रस्त्यालगतच्या उलटला. यातील रवी सहारे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत वाहतूक सुरळीत केलीय.