Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : पगार दहा हजार, इन्कम टॅक्सने नोटीस धाडली 1 कोटी 14 लाखांची; काय आहे प्रकरण?

चंद्रकात वरक हाउस किपिंगमध्ये, सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरीअर बॉय म्हणून काम करतात. यातून जेमतेम मिळणाऱ्या 10 ते 15 हजार रुपये पगारावर उदर निर्वाह करतात.

Kalyan Crime : पगार दहा हजार, इन्कम टॅक्सने नोटीस धाडली 1 कोटी 14 लाखांची; काय आहे प्रकरण?
कल्याणमध्ये सामान्य व्यक्तीला कोट्यवधीची नोटीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:03 PM

कल्याण : कल्याणमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हाऊस किपींग किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्सने 1 कोटी 14 लाखांची नोटीस धाडली आहे. चंद्रकात वरक असे नोटीस धाडण्यात आलेल्या 56 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. चंद्रकात महिन्याला सोडाच तर वर्षाकाठी कधी लाख रूपये न पाहिलेल्या वरक यांची या नोटिशीनंतर पायाखालची वाळू सरकली आहे. याबाबत त्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडे चौकशी केली. त्यावेळी विभागाकडून वरक यांच्या पॅनकार्डच्या परदेशातून ही खरेदी केल्याचा ठपका ठेवला आहे. या घटनेनंतर वरक यांनी या प्रकरणी सरकारने लक्ष घालून माझी यातून सुटका करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

महिन्याकाठी जेमतेम 10 ते 15 हजार रुपये कमावतात

कल्याणातील ठाणकरपाडा परिसरात जैन चाळीत 56 वर्षीय चंद्रकात वरक आपल्या बहिणीसह राहतात. चंद्रकात वरक हाउस किपिंगमध्ये, सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरीअर बॉय म्हणून काम करतात. यातून जेमतेम मिळणाऱ्या 10 ते 15 हजार रुपये पगारावर उदर निर्वाह करतात.

आयकर विभागाकडून 1 कोटी 14 लाखाची नोटीस

मात्र बुधवारी 1 तारखेला त्यांना आयकर विभागाकडून 1 कोटी 14 लाख रुपयांची नोटीस मिळाली. कोट्यवधीची नोटीस पाहून त्यांना धडकी भरली. त्यांनी आयकर कार्यालयात धाव घेत विचारणा केली.

हे सुद्धा वाचा

वरक यांच्या पॅनकार्डवर चीनमध्ये खरेदी

यावेळी आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पॅनकार्डवर आणि कागदपत्रांचा वापर करून चीनमधून काही वस्तूंची खरेदी करण्यात आल्याचे आणि त्यावरील कर भरणा केलेला नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचे वरक यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार ऐकून वरक यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी वरक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार तर करणारच आहे, मात्र मी सर्वसामान्य आहे. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो. संबंधित विभागाने सरकारने माझी यातून सुटका करावी अशी मागणी केली आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.