पोलिसांनी चेक केले 1000 CCTV, रडत रडतच पोलीस ठाण्यात गेली; असं काय सांगितलं?
इंदूरच्या पलासिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. पोलिसांनी या चोरीचा उलगडा करत एका महिलेला आणि तिच्या भावोजीला अटक केली आहे. चोरीची तक्रार करणारी महिलाच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मध्यप्रदेशातील पलासिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड कोटी रुपयाची चोरी झाली आहे. पोलिसांनीच या मोठ्या चोरीचा खुलासा केला आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या भाऊजीसोबत मिळून ही जबरी चोरी केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे ज्या महिलेने चोरीची तक्रार दिली, तीच चोर निघाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 13 मार्च रोजी शेफाली जादौन नावाची महिला पोलीस ठाण्यात आली होती. आपला लिव्ह इन पार्टनर अंकूशच्या शुभ-लाभ या अपार्टमेंटमधून मोठी चोरी झाल्याची तक्रार केली होती.
दीड कोटीची चोरी झाल्याचं कळाल्यानंतर पोलिसांच्याही तोंडचं पाणी पळालं होतं. पोलिसांनी या जबरी चोरीचा छडा लावण्याचा चंगच बांधला होता. त्यासाठी पोलिसांनी सुमारे 1000 सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातूनच हा भांडाफोड झाला. एक टू व्हिलर आणि एका जवळजवळ येताना दिसत आहे. पोलिसांना या कारचा संशय आला. पोलिसांनी अंकूशला या कारबाबत विचारले. त्यावर ही कार शेफालीचा भावोजी हिरा बहादूरची असल्याचं अंकूशने सांगितलं. पोलिसांनी लगेचच हिरा बहादूरला फोन लावला. पण त्याचा फोन स्विच्ड ऑफ येत होता. पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या लोकेशनवरून त्याला ट्रॅक केलं. त्याचं लोकेशन ट्रॅक करून पोलिसांनी त्याला इंदौरच्या बंगाली चौकात कारसहीत अटक केलं. त्याच्या कारच्या डिक्कीत एक बॅग होती. त्यात 79 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने होते. पोलिसांनी हा संपूर्ण माल जप्त केला आहे.
वाचा: सुष्मिता सेनच्या नवऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा… मेव्हुण्याचा कान चावला अन्… पुढे काय घडलं?
पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता शेफालीनेच तिचा भावोजी हिरा बहादूर याच्याशी मिळून ही चोरी घडवून आणली. अंकूशची पलासियामधील एक प्रॉपर्टी विकण्यात आली होती. हा पैसा तोच होता. घरात ठेवलेला होता. विशेष म्हणजे शेफालीने अंकूशवर रुग्णालयात हल्ला केल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणातील काही आरोपींचा शोध घेत आहेत.
बुरखा घालून आले आणि…
याबाबत डीसीपी हंसराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिल्डरच्या घरी दीड कोटीची चोरी झाल्याचं समजलं होतं. ही चोरी एका बरखास्त करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलने त्याच्या सहकाऱ्यासोबत मिळून बुरखा घालून ही चोरी करण्यात आली होती. 13 मार्च रोजी शुभ-लाभ या प्राईम टाऊशीपच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. पार्लर संचालिका शिवाली जादौनने तीन बॅगा चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिचा लिव्ह इन पार्टनर अंकूशच्या या बॅगा होत्या. त्यात प्रॉपर्टी विक्रीच्या सौद्यातून आलेले दीड कोटी रुपये होते. तसेच 20 तोळे सोनेही ठेवलेले होते. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना बुरखा घालून आलेले दोन चोर घटनास्थळी दिसले. पोलिसांनी या आरोपींचं लोकेशन ट्रेस केलं. आरोपी हिरा बहादूर ऊर्फ हिरो मानसिंह थापा आणि त्याचा सहकारी पिंटू रामकिशन मेहरा याला अटक केली.
प्रवीण पळाला, शोध सुरू
पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली. तेव्हा हिरा थापा आणि पिंटू बुरखा घालून चोरी करायला आल्याचं स्पष्ट झालं. हिरा थापा हा शिवालीचा भावोजी आहे. तो आधी खंडवा येथे पोलीस विभागात आरक्षक म्हणून नोकरीला होता. गुन्हेगारी कारवायात असल्याने त्याला नोकरीतून बरखास्त करण्यात आलं होतं. त्याने अंकूशच्या घरात दीड कोटीची चोरी केल्यानंतर ही रक्कम त्याने त्याचा दुसरा सहकारी प्रवीणकडे दिली होती. आता पोलीस प्रवीणचा शोध घेत आहेत.
म्हणून डल्ला मारला
शिवाली ही गेल्या अनेक वर्षापासून अंकूश सोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. अंकूश आपल्याला कधीही सोडू शकतो असं तिला सतत वाटत होतं. अंकूश त्याच्या व्यवहाराचे सर्व पैसे शुभ लाभ या अपार्टमेंटमध्ये ठेवायचा. त्यामुळे तिने ही माहिती तिचा भावोजी हिराला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्यांनी चोरीचा प्लान रचला आणि चोरी केली.