Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Mobile Theft : वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तीन चोरट्यांना अटक

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रकाश देवघरे यांचा आणि राजेश भारव्दाज यांचा मोबाईल चोरुन नेला होता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडे सोपवण्यात आला होता.

Wardha Mobile Theft : वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, तीन चोरट्यांना अटक
वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 6:21 PM

वर्धा : गर्दीचा फायदा घेऊन हाथ साफ करणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. अशाच प्रकारे वर्धेच्या बाजार समितीच्या आवारातील भाजी बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल (Mobile) लंपास करणाऱ्या टोळी (Gang)चा वर्धा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केट परिसरात गर्दीचा फायदा घेत दोघांचे मोबाईल चोरुन नेल्याची घडली होती. याप्रकरणाचा तपास शहर गुन्हे शोध पथकाने करुन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. मोहम्मद अबुल मुर्शीद अन्सारी (24 रा. बडातोफीर झारखंड), शेख शोएब शेख उम्बर (21 रा. महाराजपूर झारखंड), शेख अफ्रिदी शेख अस्लम (20 रा. महाराजपूर झारखंड) अशी अटक केलेल्या मोबाईल चोरट्यांची नावे आहेत.

गर्दीचा फायदा घेत दोन नागरिकांचे चोरले होते मोबाईल

प्रकाश सोनबाजी देवघरे आणि राजेश श्यामलाल भारद्वाज दोन्ही रा. गणेशनगर हे 24 रोजी सकाळच्या सुमारास बाजार समिती परिसरातील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. रविवार बाजाराचा दिवस असल्याने मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रकाश देवघरे यांचा आणि राजेश भारव्दाज यांचा मोबाईल चोरुन नेला होता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी तपाचचक्र फिरवून आंतरराज्यीय त्रिसदस्यीय टोळीचा पर्दाफाश करीत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 24 हजार 290 रुपयांचे दोन मोबाईल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.

आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वर्धा पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात संजय पंचभाई, दिनेश तुमाने, राजेश राठोड, सुनिल मेंढे, श्याम सलामे यांनी केली. (Interstate mobile phone theft gang busted in Wardha, three thieves arrested)

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.