Crime : मुंबईकरांनो सावधान, तुम्हालाही हा कॉल आला असेल वेळीच व्हा सावध, भायखळ्यामध्ये….

पीडित महिलेला मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करत एका कूरियर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांनी भीती दाखवली आणि महिलेला गंडवलं.

Crime : मुंबईकरांनो सावधान, तुम्हालाही हा कॉल आला असेल वेळीच व्हा सावध, भायखळ्यामध्ये....
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 9:05 PM

मुंबई : देशभरात सायबर फसवणुकीचं प्रमाण वाढत चाललं आहे. रोज नवनवीन घटना समोर येत असतानाच आता मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेला नारकोटिक्स विभागातील अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 2 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही महिला मुंबईच्या उच्चभ्रु अशा भायखळा इथं राहत असून, एका मोठ्या आयटी कंपनीत ती कामाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित महिलेला मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करत एका कूरियर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं. तुम्ही ताइवानसाठी पाठवले पार्सल काही अडचणींमुळे पाठवता येत नसल्याचे तो म्हणाला. यावर त्या महिलेने पार्सल आपलं नसल्याचं सांगून तुमचा काहीतरी गैरसमज होत असल्याचं  सांगितलं. मात्र यावर त्याने कुरियर प्रतिनिधीने त्या महिलेला ऑनलाइन पोलिसांशी संपर्क करायला लावला. कारण त्या पार्सलमध्ये 5 पासपोर्ट, 2 क्रेडिट कार्ड आणि अंमली पदार्थ असल्याचं सांगितल्यावर पीडित घाबरून गेली.

काही वेळातच ही केस अमली पदार्थांशी संबंधित असून आम्ही कॉल ‘नारकोटिक्स विभागाकडे’ वळवण्यात आल्याचं सांगत त्या महिलेला तिचा आधार नंबर विचारुन तो नंबर गुन्हेगारांच्या 3 बँक अकाऊंटला लिंक असल्याचं सांगण्यात आलं.

हे सर्व निस्तारण्यासाठी एक इंस्टेंट मॅसेंजर अॅप ‘स्काइप’ डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं, हा अॅप डाउनलोड केल्यानंतर त्या आरोपींनी महिलेला स्काइप अॅपचा आयडी देत विश्वासात घेतलं. हा आयडी नारकोटिक्स विभागाचा असून त्याद्वारे काही आरोपींचे फोटो पाठवण्यात आले. ज्या आरोपींचे फोटो पाठवण्यात आले होते, त्यांच्याच बँक अकाऊंटला त्या महिलेचा आधार नंबर लिंक असल्याचे सांगण्यात आलं.

आरोपींनी त्या महिलेला नारकोटिक्स विभागाच्या नावाने पत्र पाठवून बँक अकाऊंटबद्दल माहिती देण्यास सांगितलं आणि सत्यता तपासण्यासाठी दोन बँक अकाउंटमध्ये 98,888 रुपये जमा करण्यास सांगितले. हे पैसे गुन्हेगार पकडले गेल्यानंतर परत करण्यात येईल असे त्या महिलेला सांगण्यात आलं.

पैसे पाठवल्यानंतर काही वेळातच त्या बनावट नारकोटिक्स विभागाच्या लोकांनी महिलेशी संपर्क तोडला. महिलेला आपल्या सोबत फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आयपीसी कलम 419, 420, आणि 66(सी), 66 (डी) या कलमांखाली एफआयआर नोंदवून घेतली आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.