Jaipur-Mumbai Train Firing |आरपीएफ कॉन्स्टेबलने बुरखा घातलेल्या महिलेवर रोखली बंदूक, म्हणाला….

Jaipur-Mumbai Train Firing | मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या हत्याकांडात आणखी एक खुलासा झाला आहे. आरपीएफ जवान चेतन सिंह याने ट्रेनमधील बुरखा घातलेल्या एका महिला प्रवाशावर बंदूक रोखली आणि...

Jaipur-Mumbai Train Firing |आरपीएफ कॉन्स्टेबलने बुरखा घातलेल्या महिलेवर रोखली बंदूक, म्हणाला....
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 12:14 PM

मुंबई : जुलै महिन्याच्या अखेरीस जयपुर-मुंबई पॅसेंजरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या (Jaipur-Mumbai Train Firing)घटनेने सर्वच हादरले होते. आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात चौघांचा मृत्यू (death) झाला होता. या हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपी चेतन सिंह याने ट्रेनमध्ये बसलेल्या एका बुरखा घातलेल्या महिलेला धमकी दिली आणि बंदूक रोखून तिला ‘जय माता दी’ म्हणायला लावले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे. 31 जुलै रोजी घडलेल्या या हत्याकांडामुळे सर्व प्रवासी भयभीत झाले होते.

एका रिपोर्टनुसार, पोलीसांच्या सूत्रांनी सांगितले की, Government Railway Police (GRP) बोरीवली, येथील पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी या महिलेची ओळख पटवली असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिला प्रमुख साक्षीदार बनवण्यात आले आहे. हा संपूर्ण भाग ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, असे सूत्रांनी नमूद केले आहे. चेतन याने त्याचे वरिष्ठ टीकाराम मीणा आणि तीन प्रवासी – अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरवाला, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

महिला साक्षीदाराने काय सांगितले ?

रिपोर्ट्सनुसार, चेतन याने बी-5 कोचमध्ये टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने त्याच कोचमधील दुसऱ्या प्रवाशावरही गोळी चालवली. तर बी2 मधील पुढील प्रवाशाला पँट्रीमध्ये नेऊन गोळी मारली अन् अखेर एस-6मध्ये चौथ्या प्रवाशाला गोळी मारली. त्यानंतर तो पुढल्या डब्यात गेला, आणि बी-3 मध्ये बुरखा घातलेल्या महिला प्रवाशाला निशाणा बनवलं. त्या महिलेने नोंदवलेल्या जबाबानुसार, चेतनने तिच्यावर बंदूक रोखली आणि तिला ‘जय माता दी’ चा नारा लगावण्यास सांगितले. त्या महिलेने तसे केले असता, त्याने तिला तेच पुन्हा जोरात म्हणण्यास सांगितले.

चेतन सिंहचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये तो सांगत होता की, या लोकांना पाकिस्तानमधून ऑपरेट केलं जातंय. तसेच त्याने मीडियाचंही नाव घेतलं. त्याशिवाय भारतात रहायचं असेल तर मोदी आणि योगी यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही तो म्हणाला.या व्हिडिओतून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिसून येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.