Nupur Sharma : धक्कादायक..! थेट रचला नुपूर शर्मांच्या हत्येचा कट, उत्तर प्रदेशात दहशतवादी अटकेत, पाक कनेक्शन उघड

मोहम्मद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. या धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा देशात खळबळ माजली आहे. या कारवाईने मोठा अनर्थ हा टळला आहे. 

Nupur Sharma : धक्कादायक..! थेट रचला नुपूर शर्मांच्या हत्येचा कट, उत्तर प्रदेशात दहशतवादी अटकेत, पाक कनेक्शन उघड
धक्कादायक..! थेट रचला नुपूर शर्मांच्या हत्येचा कट, उत्तर प्रदेशात दहशतवादी अटकेत, पाक कनेक्शन उघडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:59 PM

लखनऊ : एटीएसने (ATS) सहारनपूरमधून जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि तहरीक-ए-तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला. एटीएसने त्याची ओळख मोहम्मद नदीम अशी केली आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान दहशतवाद्याने सांगितले की त्याला पाकिस्तानच्या जैशच्या दहशतवाद्यांनी त्याला नुपूर शर्मांना (Nupur Sharma) मारण्याचे काम दिले होते. एटीएसने एक प्रेस नोट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. एजन्सीला माहिती मिळाली होती की सहारनपूरमधील गंगोह पोलीस स्टेशनच्या कुंडकलान गावात एक व्यक्ती फिदाईन हल्ल्याच्या तयारीत आहे, हा जैश आणि तहरीक-ए-तालिबानच्या प्रभावाखाली आहे. यानंतर मोहम्मद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. या धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा देशात खळबळ माजली आहे. या कारवाईने मोठा अनर्थ हा टळला आहे.

पाकीस्तानातून मिळालं प्रशिक्षण

टीटीपीचा दहशतवादी सैफुल्ला याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद नदीमला फिदाईन हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण आणि साहित्य पुरवले होते. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांवर हल्ला करण्याचा नदीमचा कट होता.

दहशतवादी संघटनांचे चॅट आणि ऑडिओ मसेज सापडले

या दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात एक्सप्लोसिव्ह कोर्स फिदाई फोर्स असे एक डॉक्यूमेंट सापडले. मोहम्मद नदीमच्या फोनवरून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांचे चॅट आणि ऑडिओ मसेजही मिळाले आहेत.

अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात

मोहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की तो 2018 पासून जैश-ए-मुहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे, जसे की व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तो वेळोवेळी त्यांच्याशी बातचीत करत असत. त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून 30 हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते.

लवकरच पाकीस्तानलाही जाण्याचा आखला प्लॅन

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे दहशतवादी नदीमला पाकिस्तानात बोलावत होते. तो लवकरच व्हिसा घेऊन पाकिस्तानला जाणार होता. यानंतर तो इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होता. भारतातील दहशतवाद्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. सध्या त्यांच्या अटकेसाठी एटीएसनेही कारवाई सुरू केली आहे. या दहशतवाद्यांच्याही पोलीस लवकरच मुस्क्या आवळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.