120 महिलांवर रेप करणारा हा जिलेबी बाबा, घरातील ‘हा’ रोजचा पदार्थ असा वापरायचा

बाबा अमरपुरी ऊर्फ जलेबी बाबाला 5 जानेवारी न्यायालयाने दोषी ठरवले. यानंतर 10 जानेवारी रोजी बाबाला शिक्षा सुनावण्यात आली.

120 महिलांवर रेप करणारा हा जिलेबी बाबा, घरातील 'हा' रोजचा पदार्थ असा वापरायचा
जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 7:14 PM

फतेहाबाद : चहामध्ये नशेचे पदार्थ टाकून ती चहा महिलांना पाजत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बहुचर्चित जलेबी बाबाला फतेहाबादच्या जलदगती न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. नायालयाने या बाबाला 14 वर्षाच्या शिक्षेसह 35 हजार रुपये दंड, तसेच कलम 376 सी नुसार 7-7 वर्षाची शिक्षा, पोक्सो कायद्याअंतर्गत 14 वर्षाची शिक्षा आणि कलम 67 नुसार 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आर्म्स अॅक्टमध्ये न्यायालयाने बाबाला दोषमुक्त केले आहे. या बाबाचे महिलांसोबतचे 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले होते. या खटल्यात 6 पीडितांनी न्यायालयात हजर राहून बाबाच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला. पीडितांच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने निर्णय दिला.

10 जानेवारी रोजी बाबाला सुनावली शिक्षा

बाबा अमरपुरी ऊर्फ जलेबी बाबाला 5 जानेवारी न्यायालयाने दोषी ठरवले. यानंतर 10 जानेवारी रोजी बाबाला शिक्षा सुनावण्यात आली. हा जलेबी बाबा चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून महिलांना द्यायचा, मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.

2017 मध्ये एका महिलेने दाखल केली होती तक्रार

या अत्याचाराचे व्हिडिओ बनवून तो महिलांना ब्लॅकमेल करत पैसे उकळायचा. याप्रकरणी 13 ऑक्टोबर 2017 रोजी एका महिलेने टोहाना शहर पोलिसात बाबाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार टोहाना शहर पोलिसांनी बाबाविरोधात कलम 328, 376, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

यानंतर 19 जुलै 2018 मध्ये एका गुप्त बातमीदाराने पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कुमार यांना बाबाचा एक अश्लील व्हिडिओ दाखवला. तत्कालीन एसएचओ यांच्या तक्रारीवरुन खटला दाखल करण्यात आला.

बाबाच्या घरुन 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ जप्त

खटला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाच्या घरी छापा टाकून चिमटा, राख, विभूती, नशेच्या गोळ्या आणि व्हिसीआर जप्त केले. तसेच छापेमारीत बाबाचे 120 हून अधिक व्हिडिओ हाती लागले.

जिलेबीचा गाडा चालवायचा बाबा

अमरपुरी ऊर्फ जलेबी बाबा हा पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. 20 वर्षांपूर्वी तो मानसाहून टोहाना येथे कुटुंबासोबत आला. जलेबी बाबाला सहा मुले आहेत. टोहानामधील नेहरु मार्केटमध्ये त्याने जिलेबीचा गाडा सुरु केला. जवळपास 10 वर्षे त्याचा व्यवसाय व्यवस्थित सुरु होता.

पत्नीच्या निधनानंतर तांत्रिकाच्या संपर्कात आला

याच दरम्यान त्याच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर तो एका तांत्रिकाच्या संपर्कात आला. दोन वर्ष जलेबी बाबा टोहानातून गायब होता. दोन वर्षांनी परतल्यानंतर त्याने टोहानामध्ये स्वतःचे घर घेतले आणि मुलांसह राहू लागला. याच घराजवळ त्याने बाबा बालकनाथच्या नावाने मंदिर बांधले होते.

घराबाहेर त्याने दुःख आणि कष्ट दूर करण्यासाठी फलक लावला. यानंतर तांत्रिक विद्येची जादू चालू लागली आणि त्याच्याकडे लोकांची गर्दी जमू लागली. शिवाय बाबाकडे भरपूर पैसे येऊ लागले.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....