Jalgaon Crime : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आठ वर्षे छळलं, मोठं घबाडही लुटलं
अश्लील फोटो व्हायरल (Girl Photo) करण्याची धमकी देऊन एका तरुणासह त्याचे मित्र व कुटुंबीयांनी 22 वर्षीय तरुणीचा आठ वर्षांपासून (Persecution) छळ केला आहे, तसेच तिच्यावर अत्याचार करित तरुणीच्या हातातील अंगठ्या, सोनसाखळी, 50 हजार रुपये असा ऐवजही लुबाडून घेतला.
जळगाव : जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यात एक हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहेत. अश्लील फोटो व्हायरल (Girl Photo) करण्याची धमकी देऊन एका तरुणासह त्याचे मित्र व कुटुंबीयांनी 22 वर्षीय तरुणीचा आठ वर्षांपासून (Persecution) छळ केला आहे, तसेच तिच्यावर अत्याचार करित तरुणीच्या हातातील अंगठ्या, सोनसाखळी, 50 हजार रुपये असा ऐवजही लुबाडून घेतला. अखेर या तरुणीने आठ वर्षांनंतर या घटनेला वाचा फोडली . सात जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीसूत गुन्हा दाखल केला . विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोन महिलांचा समावेश आहे. तरुणी 14 वर्षांची असताना भुसावळ शहरात शालेय शिक्षण घेत होती, तेव्हापासून धक्कादायक घटनेची सुरुवात झाली. रितेश सुनील बाविस्कर हा तरुण शाळेच्या आवारात तिला भेटला. त्याने मोबाइलमध्ये तरुणीसह तिच्या मैत्रिणीचे फोटो मॉफिंग केले. हे फोटो दाखवून त्याने पहिल्यांदा तिला धमकावले.
धमकावून पैसेही उकळले
“तुला जसे सांगेन तसे कर नाही तर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेन” अशी धमकी दिली. त्याच्या धमक्यांना तरुणी बळी पडली. त्याने सोबत बंटी व राहुल नावाचे दोन मित्र घेऊन तरुणीस भुसावळच्या इंजीनघाट परिसरात नेऊन अत्याचार केला. या वेळी बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले. तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून शाळेजवळ सोडले . ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेन’ अशी धमकी रितेशने दिली . ही गोष्ट येथेच थांबली नाही , तर रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण नंदिनी राहुल कोळी यांनीही तरुणीस धमकावले . ‘घरातून पैसे चोरून आण’ असे सांगितले. तिचे लग्न ठरले तेव्हा पुन्हा धमकी देऊन तिच्याकडून 50 हजार रुपये उकळले. तिला जळगाव , येवल येथे घेऊन जात कुंटणखान्यात ठेवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर रितेशने तिला मुंबईला नोकरीच्या मुलाखतीच्या नावाने बोलावून घेत तेथेही अत्याचार केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
काही दिवसांपूर्वीच या तरुणीचे लग्न ठरण्याची वेळ आली होती . रितेशला माहिती मिळताच त्याने जळगावात येऊन तिला खान्देश सेंट्रल परिसरात घेऊन गेला. ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी देत विनयभंग केला. परत जात असताना पुन्हा एकदा तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने जळगाव शहर पोलिस ठाणे गाठून आपबीती कथन केली. त्यानुसार रितेश सुनील बाविस्कर , त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, बहीण नंदिनी राहुल कोळी, वडील सुनील बाविस्कर , मित्र उर्वेश पाटील, बंटी आणि राहुल या सात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.