AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon honor killing सुडाने पेटलेल्या बापाने हळदीत नाचणाऱ्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर केला गोळीबार..

प्रेम विवाहानंतर तृप्ती ही तिच्या सासरी पुण्यात राहत होती. पती अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचाच हा विवाह सोहळा होता. त्यात हे सैराटलाही लाजवणारे हत्याकांड घडले आहे.

Jalgaon honor killing सुडाने पेटलेल्या बापाने हळदीत नाचणाऱ्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर केला गोळीबार..
Jalgaon honor killing
| Updated on: Apr 28, 2025 | 3:47 PM
Share

जात नाही ती जात असे म्हटले जाते…खोट्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीला आणि जावयावर सर्व्हीस रिव्हॉलव्हरमधून गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जीव तर जागच्या जागी गेलाच शिवाय तिच्या पोटातील नवा अंकुर जगात येण्याआधीच खुडला गेला आहे. तर जावयाच्या पोटात गोळी लागल्याने त्याला पुण्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने एका लग्न सोहळ्यात जावई आणि मुलगी नाचत असतानाच त्यांच्यावर गोळ्यांच्या फेरी झाड्याने संपूर्ण मंडपात मातम पसरला..ही हृदयद्रावक घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली असून खोटी प्रतिष्ठा आणि जातीय अहंकाराचा आणखी एक बळी गेल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे.

आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्ताचे पाट

तृप्ती वाघ या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या, अविनाश वाघ आणि तृप्ती यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मुलीच्या बापाच्या मनात खदखदत होता. मुलीने चारचौघात अब्रु घालविली या रागाने फणफणलेल्या किरण मांगले यांनी पुण्यातून आपल्या होणाऱ्या जाऊ बाईंच्या लग्नातील  हळदीच्या कार्यक्रमात चोपडा शहरात आलेल्या मुलीवर हा गोळीबार केला आणि लग्न मंडपात एकच हाहाकार उडाला. तृप्ती यांचे वडिल किरण मांगले त्याठिकाणी आले त्यावेळी मुलीला आणि जावयाला नाचताना पाहून त्यांचे डोके भणभणले आणि त्यांनी जवळून या दाम्पत्यावर गोळीबार केला. चोपडा शहरातील आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात ही  गोळीबाराची भयानक घटना घडली.

बहिणीचा विवाह सोहळा काळवंडला

अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा या घटनेमुळे आज अंत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले गोळीबार करणारे मुलीचे वडिल किरण अर्जुन मांगले (४८ ) यांच्यावर एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तृप्ती (२४ ) हीने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन अविनाश वाघ (२८ ) यांच्याशी प्रेमविवाह केला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.