एक तर प्रेमविवाह, त्यात लग्नाच्या दिवशीच संशयास्पद मृत्यू, पतीही गेला, जळगावात काय घडलं?

पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही काही दिवस बेपत्ता होते. त्यानंतर हे दोघे लग्न करुन परतले. त्यावेळी निर्माण झालेला वाद दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन मिटवला होता.

एक तर प्रेमविवाह, त्यात लग्नाच्या दिवशीच संशयास्पद मृत्यू, पतीही गेला, जळगावात काय घडलं?
क्राईम
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 11:10 AM

जळगाव: प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये घडली होती. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच त्या तरुणीच्या पतीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रशांत पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. (Suspected death of married couple, three arrested)

पाळधी गावातील या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयत आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना शनिवारी अटक केली आहे.

पाळधी गावातील आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही काही दिवस बेपत्ता होते. त्यानंतर हे दोघे लग्न करुन परतले. त्यावेळी निर्माण झालेला वाद दोघांच्याही पालकांनी विवाहाला मान्यता देऊन मिटवला होता. मात्र, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. आरतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी पती प्रशांतनेही विषारी औषध घेतलं. त्यामुळे त्याचीही प्रकृती खालावली. त्याला जळगाव इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंती दिवशी मंदिरात जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर अवघ्या 3-4 दिवसातच आरतीचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रशांतनेही मृत्यू जवळ केला. पोलिसांनी या प्रकरणाता तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या:

3 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार? विव्हळत शेतात सापडली

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

Suspected death of married couple, three arrested

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.