Murder: प्रेसयीला भेटायला गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या! जळगावात एकच खळबळ, 24 तासांच्या आत दुसरा खून
जळगाव (jalgaon crime) शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रिक्षा चालकाचा (Auto Driver) दुसरा खून झाल्यची धक्कादाय घटना समोर आलीय. त्यामुळे पोलीस प्रशासनाचीही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
जळगाव : जळगाव शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. कारण एकाच दिवसात दोन खून (Murder) झाल्याने जळगाव हादरून गेलंय. जळगाव (jalgaon crime) शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रिक्षा चालकाचा (Auto Driver) दुसरा खून झाल्यची धक्कादाय घटना समोर आलीय. प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करुन खून करण्यात आला आहे. जळगावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. हत्येची घटना घडल्याचं कळल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी तातडीनं पावलं उचलली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केलं. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात जखमी अवस्थेत नेलेल्या तरुणाला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी सध्या जळगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत तरुणाच्या कुटुंबांनीही एकच गर्दी केली होती. दरम्यान, चोविस तासांच्या आत जळगावात दुसरी हत्या झाल्यानं पोलिसांचीही झोप उडाली आहे. समता नगर इथं मध्यरात्री सागर पवार या तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेला 24 तासही उलटले नव्हते. की आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आधी सागरची हत्या, आता कुणाचा खून?
सागर पवार यांच्या हत्येनंतर आता प्रेयसीला भेटायला गेलेल्या 28 वर्षांच्या तरुणाचा खून झाला आहे. या तरुणाचं नाव नरेश आनंदा सोनावणे असं आहे. नरेश हा शहरातील फेडरेशन इथं आपल्या कुटुंबासह राहत होते. रिक्षा चालवून नरेश आपलं घर चालवत होतं.
हत्येच्या घटनेनं कुटुंबीय हादरले
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय नरेश गेला होता. दरम्यान. 2 वाजण्याच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली. सागरनंतर झालेल्या नरेशच्या हत्येनं जळगाव शहर पुन्हा हादरलंय. नरेश प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या शिवाजी नगर येथील घरी गेलेला. यावेळी त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. या जीवघेण्यात हल्ल्यात नरेश गंभीर जखमी झाला होता.
जखमी नरेशला पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला रुग्णालयातही आणण्यात आलं. पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसही याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. नरेशच्या हत्येनं संपूर्ण सोनावणे कुटुंबाल धक्का बसला असून आता ही हत्या नेमकी कुणा आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
Crime : दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा, 20 यांत्रिकी बोटींसह 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त
तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा करून नाशिकमध्ये लपला; भूमाफियाला दिल्ली पोलिसांच्या बेड्या!