शेतकरी कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण! अमानुष मारहाणीचा संतापजनक Video समोर

तान्ह्या बाळाला एका महिलेनं कडेवर घेतल्याचं दिसतंय. या महिलेलाही हटकण्यात आल्यांच व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. सोबतच दोन्ही व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याला पाठीवार पायावर काठीने वार करण्यात आले आहेत.

शेतकरी कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण! अमानुष मारहाणीचा संतापजनक Video समोर
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:11 PM

जालना : जालन्यातून (Jalna news) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आलीय. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेच्या मारहाणीचा (Farmers Family beaten) व्हिडीओ आता समोर आलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संपात व्यक्त करण्यात आलाय. जालना तालुक्यातील बावणे पांगरी गावातील ही घटना आहे. 10 ते 15 जणांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. लाठ्या काठ्या घेऊन अमानुष मारहाण करण्यात आली होती. शेतीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. या मारहाणीमध्ये महिलांसह मुलांनाही क्रूरपणे लाठ्या काठ्यांनी बदडण्यात आलं होतं. या घटनेचा व्हिडीओ जरी व्हायरल (Viral Video) झाला असला तरी अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलीस नेमकं कोणत्याप्रकरणी पाहतात, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

2.48 सेकंदाचे आणि 2.49 सेकंदाचे दोन व्हिडीओ मारहाणीचे समोल आलेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आधी बाचाबाची सुरु असल्याचं दिसतं. एक गट दुसऱ्या शेतकरी कुटुंबाला धमकावत असून या कुटुंबातील काहींना धरुन ठेवल्याचं दिसलंय. वेगवेगळ्या गोष्टींचा धाक दाखवून या कुटुंबाला इशारे वजा धमकी दिली जात असल्याचं दिसून आलंय.

दरम्यान, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तान्ह्या बाळाला एका महिलेनं कडेवर घेतल्याचं दिसतंय. या महिलेलाही हटकण्यात आल्यांच व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. सोबतच दोन्ही व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याला पाठीवार पायावर काठीने वार करण्यात आले आहेत. तर हात पकडलेल्या एका शेतकऱ्याचा बचाव करण्यासाठी कुटुंबातली दुसरी एक महिला प्रयत्न करते. पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेले काही व्यक्ती व्हिडीओत दिसून आलेत. हातात काठ्या असलेल्या या लोकांकडून शेतकरी कुटुंबाला दमदाटी केली जात असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शेतकरी कुटुंबही आपल्या परीने गटाला प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून आलंय.

हे सुद्धा वाचा

या घटनेचा व्हिडीओ आता संपूर्ण जालन्यात व्हायरल झाला आहे. शेतीच्या आणि जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याआधीही अशाच प्रकारे अनेकदा राज्यातील ग्रामीण भागात शेतजमिनीच्या वादातून कुटुंबाना मारहाण, दमदाटी करत राडा झाल्याचे व्हिडीओ समोर आलेले आहेत. आता या घटनेनं पुन्हा एकदा राज्यातील जमीन मालकीच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.