‘दुल्हन हम ले जायेंगे’ वऱ्हाड्यांच्या गाडीतून आले, बाजार उठवून गेले! इनकम टॅक्सची जालन्यात खत्रूड छापेमारी, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

Jalna Income Tax Raid : या छापेमारीत क्रिएटीव्हीटीही अधिकाऱ्यांना दाखवावी लागली. आठ दिवसांची ही छापेमारी सोपीही नव्हती.

'दुल्हन हम ले जायेंगे' वऱ्हाड्यांच्या गाडीतून आले, बाजार उठवून गेले! इनकम टॅक्सची जालन्यात खत्रूड छापेमारी, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी
जालन्यात मोठी छापेमारीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 11:09 AM

जालना : जालन्या इनकम टॅक्स (Jalna News) विभागाने आठ दिवस सलग केलेली छापेमारी राज्याच चर्चेचा विषय ठरतेय. या छापेमारीच्या 10 मोठ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत. अजय देवगनचा रेड (Raid Movie, Ajay Devgan) सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल, तर त्यात पैसे कुठे कसे लपवले जातात, बेनामी रोकड शोधून काढण्यासाठी काय शक्कल अधिकाऱ्यांना लढवावी लागते, हे पाहायला मिळालं होतं. आता जालन्यात जी रेड इनकम टॅक्सने (Jalna Income Tax) टाकली, तिच्यावर भविष्यात सिनेमा निघाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण या छापेमारीत क्रिएटीव्हीटीही अधिकाऱ्यांना दाखवावी लागली. आठ दिवसांची ही छापेमारी सोपीही नव्हती. कोट्यवधींची रोकड शोधणं, मोठ्या प्रमाणात सोनं हाती लागलं, आणि जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्ता पाहता, एकूणही ही किती मोठी कारवाई आयकर विभागाची होती, याची कल्पना करता येऊ शकेल. चला तर जाणून घेऊयात, याच छापेमारीच्या 10 मोठ्या गोष्टी…

  1. दुल्हन हम ले जाएंगे : तुम्ही म्हणाल हे तर सिनेमाचं नाव आहे. तसं तर आहेच. पण हेच या छापेमारीच्या निमित्तानेही पाहायला मिळालं. समोर आलेल्या माहितीनुसार दुल्हन हम ले जाएंगे असे स्टिकर आयकर विभागाच्या गाड्यांवर लागले होते. अर्थात हे अधिकारी वऱ्हाडाच्या वेशात आले आणि बेनामी संपत्ती साठवून ठेवलेल्या स्टील व्यावसिकांचा बाजार उठवून गेले.
  2. 120 गाड्यांमध्ये 300 अधिकारी : औरंगाबाद विभागाला स्टिल व्यावसायिकानं घबाड लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापेमारीचं नियोजन करण्यात आलेलं. या छापेमारीसाठी तब्बल 300 अधिकारी कामाला लावण्यात आले होते, असं कळतंय. त्यात नाशिकमधून 250 अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आलेली. त्यानंतर 120 गाड्यांमधून जवळपास 300 इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी फुल प्लॅनिंगसह 1 ऑगस्टला छापेमारी केली आणि जालन्यात धडकले.
  3. बिछान्यात कॅश : जालन्यामध्ये स्टिल व्यावसायिकावर करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये चक्क बिछान्यात कॅश आढळून आली. ही कॅश बिछान्याच लपवून ठेवण्यात आलेली होती.
  4. कपाटाखाली कॅश : दरम्यान, कपाटाखाली देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कॅश आढळून आली. यामुळे एकच खळबळ उडाली.
  5. अडगळीतल्या पिशव्यामंध्ये कॅश : फक्त बिछान्यात आणि कपाटाखालीच नव्हे, तर अडगळीत ठेवण्यात आलेल्या पिशव्यांमध्ये रोकड आढळून आल्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी चक्रावून गेले होते.
  6. 56 कोटी मोजायला 14 तास : छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोख रक्कम किती आहे हे मोजण्यात आलं. ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल 14 तास लागले. अखेर 56 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचं समोर आलं. सकाळी 11 वाजता स्थानिक एसबीआय बँकेत रोकड मोजण्यास सुरुवात करण्यात आली होती. पण कॅश काऊंटिंगचं काम संपेपर्यंत मध्यरात्रीचा 1 वाजला होता.
  7. 30 किलोपेक्षा अधिक सोनं : फक्त कॅशच नाही तर सोन्यावरही टाच आणण्यात आली आहे. 30 किलोपेक्षा जास्त सोनं या छापेमारीत जप्त करण्यात आलं. हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 32 किलो सोन्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
  8. 390 कोटींची मालमत्ता जप्त : 56 कोटी कॅश, 32 किलो सोनं यासोबत ज्या ज्या गोष्टींचा हिशोब नव्हता, अशा सर्व वस्तू, कागदपत्रांवर कारवाई करण्यात आलीय. एकूण 390 कोटी रुपयांची मालमत्ता छापेमारीत जप्त करण्यात आलीय.
  9. 8 दिवसांची छापेमारी : एकूण 8 दिवस आयकर विभागानं छापेमारी करत स्टिल व्यावसायिकांनी जमवून ठेवलेला काळा पैसा हस्तगत केलाय. 1 ऑगस्टला या छापेमारीला सुरवात करण्यात आली होती. ती 8 ऑगस्टपर्यंत सुरु होती.
  10. आता चौकशी : दरम्यान आता करण्यात आलेल्या कारवाईनंतर आयकर विभागाकडून पुढील चौकशी करत अटकेची कारवाई केली जाण्याचीही शक्यता. ही कारवाई स्टिल व्यावसायिकांवर करण्यात आली होती. याप्रकरणी पुढे आणखी काय खुलासे होतात? त्यांनी इतकं मोठं काळंधन कसं जमवलं, याचा आता तपास केला जाणार आहे. त्यातूनही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.