गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका

एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात सहा महिलांना ‘लैंगिक गुलाम’ (Sex Slave) म्हणून ठेवले होते. पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे.

गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 11:48 AM

मुंबई : एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात सहा महिलांना ‘लैंगिक गुलाम’ (Sex Slave) म्हणून ठेवले होते. पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. या युवकाने सैन्यात काम केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स येथे घडली आहे (James Robert Davis arrested by Australian federal police  for allegedly kept six slaves).

फेडरल पोलिसांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागातील जेम्स रॉबर्ट डेव्हिसच्या (James Robert Davis) घरी छापा टाकला. पोलिसांना घराच्या अनेक संशयास्पद वस्तू मोठ्या भागात पसरलेल्या आढळल्या. तपासणीनंतर पोलिसांनी डेव्हिसवर ‘महिलांना गुलाम’ केल्याचा आरोप दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी युवकाने स्वत:ला ‘हाऊस ऑफ कॅडिफर्स’चा प्रमुख म्हणून वर्णन केले आहे. एका पीडित महिलेने ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजला सांगितले की, डेव्हिसने तिच्या गळ्यात स्टेनलेस स्टीलचा पट्टा बांधून ठेवला होता आणि तिला धातुच्या एका पिंजऱ्यात बंद केले होते.

पोलिसांना लागले तब्बल 15 तास!

ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी जेम्स रॉबर्ट डेव्हिसच्या घराचे फोटोही जाहीर केले आहेत. डेव्हिसची संपत्ती मोठ्या भागात पसरलेली आहे. यावर छापा टाकण्यास पोलिसांना सुमारे 15 तासांचा कालावधी लागला. Abc.net.au च्या अहवालानुसार डेव्हिसने या भागात बऱ्याच लहान-लहान लाकडी झोपड्या बनवल्या होत्या. या झोपड्या मुख्य घरापासून शंभर मीटर अंतरावर होत्या. त्यामध्ये एक-एक बेड बसवण्यात आले होते. छापेमारी दरम्यान पोलिसांना असे चार बॉक्स सापडले, ज्यावर महिलांची नावे कोरलेली होती. पोलिसांना घराबाहेर सेक्ससंबंधित अनेक वस्तूही सापडल्या.

ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलात केले होते काम!

विशेष म्हणजे डेव्हिसने सुमारे 17 वर्षे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलात काम केले आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार डेव्हिसवर 2012 ते 2017 दरम्यान या महिलांना गुलाम केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.  पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडित महिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्यावर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचार केले (James Robert Davis arrested by Australian federal police  for allegedly kept six slaves).

महिलांना दिली होती जीवे मारण्याची धमकी

या महिलांकडून सेक्स वर्कही करून घेण्यात येत होते आणि हे काम डेव्हिसच्या देखरेखीखाली करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या महिलांना लैंगिक कामाच्या बदल्यात पैसे दिले गेले नाहीत.  पोलिसांनी सांगितले की, ज्या महिलांनी तिथून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, डेव्हिसने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुरावे म्हणून पोलिसांनी अनेक फोन, कॅमेरे आणि संगणक जप्त केले आहेत.

डेव्हिसने या गुलाम बनवलेल्या महिलांशी करार केला होता. या करारांमध्ये असे म्हणण्यात आले होते की, महिला त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार डेव्हिसकडे आत्मसमर्पण करत आहेत.

डेव्हिसवर लागणार आणखी चार्ज!

औपचारिकपणे फक्त एका पीडितेचे शोषण केल्याचा आरोप डेव्हिसवर ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, आता आणखी काही चार्ज लावले जाऊ शकतात. त्याच वेळी, 2018 मध्ये डेव्हिसने ‘कॅडिफरः अ स्टोरी अबाऊट लव्ह, फॅमिली अँड स्लेव्हरी’ नावाच्या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. यापूर्वी डेव्हिस स्वत:चे वर्णन रोप परफॉर्मर, फेटिश फोटोग्राफर, बीडीएसएम लेखक, किंक एज्युकेटर आणि कन्सेंट अ‍ॅडव्होकेट म्हणून करायचा.

(James Robert Davis arrested by Australian federal police  for allegedly kept six slaves)

हेही वाचा :

NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह इन की आऊट? ‘वर्षा’वरील बैठकीत फायनल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.