अब्जाधीशाचा तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स ?, मात्र शेवटच्या बायकोकडून विष देऊन खून, कारण काय ?

डॉन जुआन यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यांची पत्नी साकी सुडो हिनेच त्यांचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे. (don juan murdered wife saki sudo )

अब्जाधीशाचा तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स ?, मात्र शेवटच्या बायकोकडून विष देऊन खून, कारण काय ?
SAKI SUDO DON JUAN
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 12:55 AM

टोकियो : जपानमधील अब्जाधीश डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी (Don Juan) यांचा अचानकपणे मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. जपानमधील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या डॉन जुआन यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असेल हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, आता त्यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यांची पत्नी साकी सुडो (Saki Sudo) हिनेच त्यांचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे. डॉन जुआन यांना त्यांच्या पत्नीने विष देऊन संपवल्याचा अंदाज बांधला जातोय. (Japanese business Don Juan murdered by his wife Saki Sudo who claimed slept and have Sex with Four Thousand women)

डॉन जुआन यांची फक्त 25 वर्षांची पत्नी

डॉन जुआन यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय 77 वर्षे होते. मात्र त्यांची पत्नी साकी सुडो ही अत्यंत तरुण असून तिचे वय सध्या फक्त 25 वर्षे आहे. या दोघांचे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत सुडो यांनी डॉन जुआन यांना विष देऊन संपवले असा आरोप केला जातोय.

विषारी ड्रग्ज देऊन खून केल्याचा आरोप

स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी हे जपानमधील एक अब्जाधीश होते. रियल ईस्टेट तसेच दारुचा त्यांच्या उद्योग होता. तीन वर्षांपूर्वी मे महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातून विषारी ड्रग्ज बाहेर आल्याची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे डॉन जुआन यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांची पत्नी साकी ही डॉन यांच्यासोबतच होती.  साकी सुडे या उपस्थित असल्यामुळे डॉन जुआन यांचा खून त्यांनीच केला असावा अशी शंका पोलिसांना होती. पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर साकी सुडो यांनी त्यांच्या मोबाईलवर विषारी ड्रग्जबाबत इंटरनेटवर सर्च केल्याचं पोलिसांना समजलं. याच कारणामुळे सुडो यांनीच डॉन जुआन यांचा खून केला असावा असे म्हटले जातेय.

तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स

अब्जाधीश डॉन जुआन यांच्याबद्दल काही विशेष माहितीसुद्धा समाजमाध्यमांवर फरते आहे. डॉन जुआन यांचे 2016 साली एक आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. यामध्ये तब्बल 4 हजार महिलांसोबत सेक्स केल्याचा दावा त्यांनी केला होता. या सर्व महिलांना त्यांनी कित्येक कोटी रुपये दिल्याचेसुद्धा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेले आहे. त्यांनी या आत्मचरित्रात स्वत:ला स्पॅनिश प्लेबॉय समजत असल्याचंसुद्धा म्हटलंय. तसेच आकर्षक महिलांना डेट करणं हेच पैसे कमवण्यामागचं उद्दीष्ट असल्याचंही त्यांनी आत्मचरित्रात सांगितलेलं आहे.

संपत्तीमुळे डॉन जुआन यांचा खून ?

स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार डॉन जुआन त्यांची सगळी संपत्ती युआन शहराच्या विकासासाठी दान करणार होते. तशी माहिती त्यांच्या मृत्यूपत्रात होती. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला माहिती होती. त्यामुळेच डॉन जुआन यांचा त्यांच्या पत्नीने खून केला.

इतर बातम्या :

Bill Gates On Corona Vaccine | बिल गेट्सचं भारतविरोधी वक्तव्य ?, म्हणतात विकसनशील देशांना लसीचा फॉर्म्यूला देऊ नये

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक

(Japanese business Don Juan murdered by his wife Saki Sudo who claimed slept and have Sex with Four Thousand women)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.