Jhanvi Kukreja | मुंबईला चक्रावणाऱ्या जान्हवी कुकरेजा मर्डरचे 10 अँगल
पोलिसांना या प्रकरणात लव्ह ट्रँगल असल्याच्या संशय आल्यानं त्यादृष्टीनं तपास सुरु झाला होता. (Jhanvi Kukreja Murder Case)
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खार येथे झालेल्या जान्हवी कुकरेजा(Jhanvi Kukreja) या तरुणीच्या हत्याकांडाने मुंबई हादरली होती. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीत या घटनेतील संशयित आरोपी श्री जोगधनकर (Shri Jogdhankar) आणि दिया पडाणकर (Diya Padankar) या जोडप्याने केलेल्या मारहाणीत जान्हवी कुकरेजाला जीव गमवावा लागला. पोलिसांना या प्रकरणात लव्ह ट्रँगल असल्याच्या संशय आला होता. त्यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर या प्रकरणात नवनव्या गोष्टी समोर येत आहेत, अजून काही गोष्टी समोर यायच्या आहेत. (Jhanvi Kukreja Murder Case 10 angles in Police Investigation)
जान्हवी कुकरेजा खून प्रकरणातील 10 अँगल
1.श्री जोगधनकरनं गांजा सेवन केल्याचा दियाचा दावा
जान्हवी कुकरेजा खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी श्री जोगधनकर याने पार्टीमध्ये जाण्यापूर्वी गांजाचे सेवन केल्याचा दावा दियानं केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या जबाबात दियानं ही माहिती दिली आहे. दिया पडाणकरच्या दाव्यात किती तथ्य आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
2. रात्री 2 वाजता जान्हवी आणि श्रीमध्ये वाद
जान्हवी कुकरेजाची आई निधी कुकरेजांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरचा दिवस संपून नववर्ष सुरु झाल्यानंतर 12 वा.5 मिनिटांनी श्री आणि दिया त्यांच्या घरी आले. त्यांतर तिघेही खार येथे होणाऱ्या पार्टीला गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवी आणि श्री जोगधनकर यांच्यामध्ये रात्री 2 वाजण्याच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मारपीट करण्यास सुरुवात झाली. या वादात जान्हवी पायऱ्यांवर खाली पडली. तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याचं पाहून श्री जोगधनकर तिथून पळून गेला.
3. श्री आणि दियाची जवळीक वाढल्यानं जान्हवी संतप्त
खारमधील यश आहुजा यांनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यापार्टीमध्ये श्री जोगधनकर, जान्हवी कुकरेजा, दिया पडाणकर आणि इतर एक मुलगी सहभागी झाले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पार्टीतील श्रीच्या वर्तनामुळे जान्हवी संतप्त झाली होती. दिया आणि पडाणकर आणि श्री जोगधनकर यांच्यातील जवळीक पाहून जान्हवी संतप्त झाली होती. तिनं यासर्व प्रकाराची माहिती एका मित्राला दिल्याचा दावा पार्टीतील उपस्थित व्यक्तीनं केला आहे.
4. पाचव्या मजल्यावरील हाय प्रोफाईल ड्रामा
जान्हवी कुकरेजा पार्टीमध्ये घडत असलेल्या प्रकाराची माहिती तिच्या मित्राला देत होती. यादरम्यान श्री आणि दिया इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेले. त्यांच्यामागोमाग जान्हवी देखील गेली. श्री आणि दियाला एकत्र पाहून जान्हवी संतप्त झाली. यामुळे त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार यावेळी जान्हवी आणि दियामध्ये जोरदार भांडण सुरु झाले. यामध्ये जान्हवीनं ढकलल्यामुळं दिया पायऱ्यांवर कोसळली तिला दुखापत झाली आणि तिच्या ओठातून रक्त यायला लागले. त्यानंतर दिया यश आहुजाच्या खोलीत जाऊन झोपली.
5. दिया पडाणकर दोन वेळा यश आहुजाच्या घरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश आहुजांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जान्हवी कुकरेजा आणि दिया पडाणकर 8.30 वाजता आल्या होत्या. मात्र, त्या माघारी गेल्या. जान्हवी आणि दिया पडाणकर श्री जोगधनकर याच्यासोबत रात्री उशिरा पार्टीमध्ये परतल्या होत्या. जान्हवी कुकरेजा हिचा खून झाला त्यादिवशी पार्टीचे आयोजक यश आहुजा यांच्या घरी दिया पडाणकर दुसऱ्यांदा गेली होती. तिथे तिनं जेवण केले आणि झोपली. मात्र, तिने जान्हवी बद्दल एकही शब्द काढला नाही. यावेळी यश आहुजांना दियाच्या ओठातून रक्त येत असल्याचं दिसून आलं.
6. पार्टीत मादक पदार्थांचा वापर?
जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलीस यापार्टीत मादक पदार्थांचं सेवन झालं होतं का? याचाही तपास करत आहेत. पोलिसांनी पार्टीला उपस्थित असणाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे. न्यू ईयर पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम बनवण्यात आले होते. या पार्टीत सहभागी होणाऱ्यांना ब्रिंग युवर ओन ब्रुज (बीवायओबी) म्हणजेच तुम्हाला जे ड्रिंक आणायचं आहे ते आणावं आणि प्यावं, असा नियम होता.
7. डॉक्टरांच्या अहवालात हत्या झाल्याचं निष्पन्न
न्यू ईयर पार्टी सुरु झाल्यानंतर जान्हवी, श्री आणि दिया यांच्यासह तिथे आणखी एक मुलगी उपस्थित होती. त्या मुलीला उलटी होत असल्यामुळे तिला खाली सोडण्यासाठी दिया पडाणकर गेली. दिया माघारी आल्यानंतर श्री जोगधनकर यांच्यातील जवळीक पाहून जान्हवीला राग आला. यानंतर तिनं आरडाओरडा सुरु केल्यानं दियानं जान्हवीला थप्पड लगावली. पोलिसांच्या मते हा सर्व प्रकार इमारतीच्या पाचव्या माळ्यावर झाला. तिथून जान्हवी कुकरेजाची एक चप्पल आणि कानातील रिंग मिळाली आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर पोलिसांना रक्त आणि जान्हवीचे केस आढळले. पोलिसांच्या अंदाजानुसार पायऱ्यांवर लाईट आणि कॅमेरा नव्हता. जान्हवीच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून हे खूनाचे प्रकरण असल्याचे सांगण्यात आले होते.
8. जान्हवीची हत्या डोके आपटून ?
पोलिसांनी लावलेल्या अंदाजानुसार जान्हवी कुकरेजाचा मृत्यू डोके भिंतीवर आपटल्यानं झाला असावा. कारण श्री जोगधनकर याचा एक हातही फॅक्चर झाला आहे. पोलीस श्री जोगधनकर याचा हात फॅक्चर कसा झाला याचा तपास करत आहेत. श्रीने जान्हवीला फसवून दियासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
9. श्री जोगधनकर मुख्य आरोपी
जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण हे लव्ह ट्रँगल असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी श्री आणि दियाला ताब्यात घेतलं आहे. 22 वर्षीय श्री जोगधनकर या प्रकरणात मुख्य संशयित आहे. श्रीच्या डोक्याला आणि पाठीला जखमा झाल्या आहेत.
10. यश आहुजांकडून पोलिसांना माहिती
यश आहुजांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं जान्हवीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यानं ही गोष्ट यश आहुंजाना सांगितली. यश आहुजांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली.
मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!https://t.co/eNd8IcvFC1 #Mumbai #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 1, 2021
संबंधित बातम्या:
खारमधील तरुणीच्या हत्येमागे लव्ह ट्रँगलचा संशय, न्यू इयर पार्टीत ‘काय घडलं त्या रात्री?’
जान्हवी कुकरेजाची डोकं आपटून हत्या? त्या रात्री काय घडलं ? पोलीस तपासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा
(Jhanvi Kukreja Murder Case 10 angles in Police Investigation)