love relationship | मजूर नवऱ्याने 2.5 लाखाच कर्ज घेऊन प्रियाला नर्स बनवलं, तिनेच आयुष्यभरासाठी दिली भळाळती जखम
love relationship | आयुष्यातील सर्वात मोठा झटका दिला. अनेकदा प्रेमातच माणसाला आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण मिळते. प्रियाचे ते फोटो पाहून टिंकू कुमार यादवच्या पायाखालची जमीनच सरकली
नवी दिल्ली : प्रेमासाठी माणूस सर्वकाही करतो. पण अनेकदा प्रेमातच माणसाला आयुष्यभर लक्षात राहील अशी मोठी जखम मिळते. एका मजुराच्या नशिबी सुद्धा असच आलं. तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मजुरीच काम करुन कुटुंबाच पोट भरायचा. त्याने पत्नी प्रिया कुमारीसाठी 2.5 लाख रुपयांच कर्ज काढलं. तिला शिकवून नर्स बनवलं. पत्नी शिकली, तर कुटुंबाला चांगले दिवस येतील हा विचार त्यामागे होता. प्रिया कुमारी आपल्या मजूर पतीच्या पैशाने शिकली. पण त्यानंतर तिने जे केलं, ते खरच माणुसकीला धरुन नव्हतं. पत्नीची ही कृती पाहून पती टिंकू कुमार यादवच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यासोबत असं काही होईल, याचा त्याने विचारच केला नव्हता. ज्या पत्नीला शिकवण्यासाठी त्याने लाखो रुपयाच कर्ज काढलं, तिनेच त्याला फसवलं.
‘पति-पत्नी आणि वो’ चा हा विषय आहे. प्रिया कुमारीने पती टिंकू यादवला दगा दिला. नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असताना ती बॉयफ्रेंड दिलखुश राऊतसोबत पळून गेली. तिने दिल्लीच्या एका मंदिरात दिलखुश राऊतसोबत लग्न केलं व ते फोटो विभिन्न माध्यमातून पती टिंकू कुमारपर्यंत पोहोचवले. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील ही गोष्ट आहे. 19 सप्टेंबरला पत्नी घरातून बेपत्ता झाल्याच टिंकू कुमार यादवने सांगितलं. काही अघटित घडल्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने गोड्डा जिल्हा नगरच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस चौकशीत प्रिया कुमारी ओळखीच्या दिलखुश राऊतसोबत फरार झाल्याच समोर आलं.
दोघांच लग्न कधी झालेलं?
दोघे पळून दिल्लीला गेल्याच टिंकूला समजलं. त्यांनी तिथे जाऊन एका मंदिरात लग्न केलं. त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून टिंकूपर्यंत पोहोचवले. पती टिंकू यादव आता पोलिसांकडे न्याय मागत आहे. तिच्या शिक्षणावर इतका खर्च केला, ते पैसे परत मागत आहे. वर्ष 2020 मध्ये टिंकू कुमार यादवच प्रिया कुमारी बरोबर लग्न झालं होतं. लग्नानंतर प्रिया कुमारीने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. टिंकू यादवने तिला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. यासाठी त्याने पदरचे 2.50 लाख रुपये खर्च केले. टिंकू यादवने यासाठी कर्ज काढलं व शकुंतला नर्सिंग कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळवून दिला. पत्नीच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून टिंकूने शहरातील वसतिगृहात तिच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. प्रिया कुमारी फायनल इयरला होती. पण या दरम्यान ती प्रेमात आकंठ बुडाली होती. प्रियकर दिलखुश राऊतसोबत ती पळून गेली व लग्न केलं.