Job Fraud Gang | परदेशी नोकरीच्या आमिषाने 300 जणांची फसवणूक, मुंबईत 6 जणांच्या टोळीला अटक

मुंबई क्राईम ब्रँचने 300 लोकांपेक्षा जास्त लोकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे. 

Job Fraud Gang | परदेशी नोकरीच्या आमिषाने 300 जणांची फसवणूक, मुंबईत 6 जणांच्या टोळीला अटक
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 12:44 PM

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन झालं. त्यादरम्यान बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या (Job Fraud Gang Mumbai). बेरोजगार आणि गरजू लोक नोकरीच्या जाहिरातींवर असलेल्या प्रत्येक क्रमांकावर संपर्क साधून नोकरीच्या शोधात होते. लोकांच्या या मजबुरीचा फायदा घेत काही लोकांनी नोकरीच्या बनावट जाहिराती दिल्या आणि परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली मोठ्या संख्येत कामगार वर्गाच्या लोकांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला (Job Fraud Gang Mumbai).

मुंबई क्राईम ब्रँचने 300 लोकांपेक्षा जास्त लोकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे.  त्यांच्याकडून पोलिसांनी अडीचशेहून अधिक पासपोर्ट, बनावट व्हिसा आणि बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत.  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तारक मंडळ, जयंतकुमार मंडळ, सुफुद्दीन शेख, मयुनिद्दीन गोल्दर, अब्दुल शेख आणि मोइनुद्दीन शेख अशी आहेत.

अटक आरोपींनी मुंबईतील मालाड भागातील एव्हर शाईन मॉलमध्ये जॉब कन्सल्टन्सी ऑफिस उघडले. जेथे त्यांनी मुलाखतीसाठी आणि उर्वरित औपचारिकतेसाठी लोकांना बोलावले होते. हे लोक एका माणसाकडे 80 हजार ते 1 लाख रुपयांची मागणी करत असत. एकदा ज्यांच्याकडून त्यांना पैसे मिळून जात होते. त्यांना हे लोक टाळाटाळ करायला सुरुवात करत होते.

आरोपींनी नोकरीच्या जाहिरातीबद्दल एक पॅम्फ्लेट बनविला होता, ज्यावर त्यांनी दहावीपासून पदवीपर्यंत लोकांना  रशियामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखविला होता. या लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे जाहिरात  खूप व्हायरल केले होते. त्यांचे लक्ष्य उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मधले तरुण आणि बेरोजगार होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ही जाहिरात व्हायरल झाल्यामुळे या लोकांना शेकडो गरजू लोकांचे कॉल येऊ लागले (Job Fraud Gang Mumbai).

डिसीपी पठाण म्हणाले की, या लोकांना मुंबईत नोकरी देण्याच्या नावाखाली टोळी लोकांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक त्या मॉलमध्ये या प्रकारची रोजगार एजन्सी चालवायची परवानगी नाही आणि हे लोक बेरोजगारांना फसवत आहेत. पश्चिम बंगालमध्येही या लोकांनी सुमारे 100 जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे आणि स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी आपली कार्यालये बंद केली. मुंबईत येऊन इथे फसवणूक करण्यास सुरवात केली.

Job Fraud Gang Mumbai

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

Breaking : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी

परदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक

नकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, 5 दलाल अटकेत, सव्वा लाखांची तिकिटे जप्त

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....