आधी गाड्या चोरायचा, मग त्यावरूनच वृद्ध महिलांना लुटायचा, सराईत चोरट्याला पोलिसांनी दाखवला इंगा

एका सराईत चोराला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो एवढा चलाख होता की पोलिसांना चकवण्यासाठी एकावर एक असे वेगवेगळे शर्ट घालायचा आणि मग चोरीसाठी बाहेर पडायचा. पोलिसांनी 250 हून अधिक सीसीटीव्ही तपासत चोरट्याला अटक केली.

आधी गाड्या चोरायचा, मग त्यावरूनच वृद्ध महिलांना लुटायचा, सराईत चोरट्याला पोलिसांनी दाखवला इंगा
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 10:27 AM

ठाणे | 1 डिसेंबर 2023 : गुन्हेगार… मग तो कोणीही. छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर किंवा सराईत आरोपी, कधी ना कधी पकडला जातोच. ‘कानून के हाथ लंबे होते है’ असं म्हणतात, ते काही उगीचच नाही. एखादी छोटीशी चूकही गुन्हेगाराला अडकवण्यासाठी पुरेशी ठरते. सध्या गुन्ह्यांचे प्रमाणा बरेच वाढले असले तरी गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसही सज्ज असतात. अशाच एका सराईत चोराला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो एवढा चलाख होता की पोलिसांना चकवण्यासाठी एकावर एक असे वेगवेगळे शर्ट घालायचा आणि मग चोरीसाठी बाहेर पडायचा. बराच काळ तो हातातून निसटल्यानंतर, अखेर पोलिसांनीही त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्याच.

मोहम्मद उर्फ सलमान करीब शहा सय्यद उर्फ जाफरी असे या इराणी चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी ठाणे ते नाशिक या 80 किलोमीटर परिसरातील 250 हून अधिक सीसीटीव्ही तपासले आणि या सराईत गुन्हेगाराला शहापूर येथून त्याच्या मुसक्या आवळत अटक केली. तसेच त्याचे सहा गुन्हे उघडकीस आणत पाच लाख 70 हजारचा मुद्देमालही जप्त केला.

एकावर एक शर्ट चढवून मग..

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद उर्फ सलमान करीब शहा सय्यद उर्फ जाफरी हा सराईत गुन्हेगार आहे. चोरीसाठी तो अनोखी क्लुप्ती लढवायचा. चोरी करायला बाहेर पडताना तो अंगावर एकावर एक असे तीन चार शर्ट घालायचा आणि डोक्यावर स्टायलिश हेल्मेटही लावायचा. जेणेकरून चोरीनंतर पोलिसांनी पाठलाग केलाच, तर पोलिसांना चकमा देण्यासाठी तो अंगावरील शर्ट काढून टाकायचा. त्यामुळे त्याला पटकन शोधणं पोलिसांसाठी कठीण व्हायचं.

आधी गाड्या चोरायचा, मग त्याच गाड्यांवरून वृद्धांना लुटायचा

आरोपी मोहम्मद हा आधी रस्त्याचा बाजूला उभ्या असलेल्या बाईक्स, मोटर सायकल चोरायचा. आणि नंतर त्या बाईक्सची नंबरप्लेट काढून, त्यावरच स्वार होऊन रस्त्यातील वृद्धांना टार्गेट करायचा. वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने, सोन्याची चेन वगैरे पळवून तो धूम ठोकायचा.

अखेर या सराईत इराणी चोट्याला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यासाठी त्यांनी ठाणे ते नाशिक परिसरातील 250 हून अधिक सीसीटीव्हींची तपासणी केली. आणि सापळा रचत शहापूर परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी त्याते सहा गुन्हे उघडकीस आणत साडेपाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. त्याने आणखी कुठे, किती ठिकाणी चोरी केली आहे, याचाही तपास कळवा पोलीस करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.