AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : कल्याणमध्ये तडीपारी आणि मोक्का कारवाईला वेग, दादा भाईंच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या, इतक्या जणांना घेतलं ताब्यात

Crime news वर्षभरात 16 लोकांवर तडीपार, तर 8 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत दादा भाईंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात कल्याण झोन 3 पोलीस संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी ऍक्शन मोडवर आहे. कारवाई होत असल्यामुळे भाईगिरी करणाऱ्यांना घाम फुटला आहे.

Kalyan : कल्याणमध्ये तडीपारी आणि मोक्का कारवाईला वेग, दादा भाईंच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या, इतक्या जणांना घेतलं ताब्यात
kolasewadi police stationImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 11, 2023 | 10:30 AM
Share

कल्याण : कल्याण (Kalyan) पूर्वेत खुलेआम गुन्हेगारीमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, हत्यार घेऊन लोकांना घाबरवणे, शस्त्र घेऊन फिरणे, तलवारी घेऊन दहशत माजवणे, हल्ला करणे, चोऱ्या करणे अशा एक ना अनेक घटनांमुळे पूर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी (Police) मोक्काअंतर्गत कारवाई सुरु केली आहे. त्याचबरोबर तडीपारीच्या कारवाया गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तिथं दहशत पसरवणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या वर्षभरात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन (kolsepatil) हद्दीत एकूण 16 लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गुंडांचा मुक्काम जेलमध्ये असणार हे नक्की !

गेल्या चार महिन्यात 5 जणांना तडीपार करण्यात आला आहे. तर वर्षभरात 8 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. सध्याची संघटित गुन्हेगारी पाहता आगामी काळात मोक्का आणि तडीपारीच्या कारवायांना देखील वेग येणार असल्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. त्यामुळे आता खुलेआमपणे दहशत माजवली तर जास्त काळासाठी गुंडांचा मुक्काम जेलमध्ये असणार हे नक्की ! पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दहशत माजवणाऱ्या अनेकांनी कल्याण शहरातून कारवाईच्या भीतीने पळ काढला आहे. ज्या परिसरातून पळ काढला, त्यांचा पोलिस विविध पद्धतीने शोध घेत आहे.

चिथावणीखोर लोकांवर देखील विविध कलमानुसार…

कल्याण पूर्वेत तरुणाईचा गुन्हेगारीत जास्त समावेश असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यातही 18 ते 22 या वयोगटातील मुलांचं प्रमाण गुन्हेगारीत जास्त असल्याचं पोलीसांनी सांगीतलं आहे. सध्या तरुणांना लगेचं राग येतो अन् नंतर त्यातून गुन्हा घडतो, किंवा एखादा गुन्हा घडण्यासाठी अनेकदा चिथावणी देखील दिली जाते, अशा चिथावणीखोर लोकांवर देखील विविध कलमानुसार 107 प्रमाणे – 168, 110 प्रमाणे 31 तर 109 प्रमाणे 9 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीचं कंबर कसली आहे. त्यामुळे कल्याणमधील गुन्हेगारी काही प्रमाणात का होईल कमी झाली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.