VIDEO | कल्याणमध्ये कबड्डीपट्टूंमध्ये राडा, दोन नामांकित कबड्डी खेळाडूंना मारहाण
कल्याणमध्ये कबड्डीपट्टूंमध्ये राडा पाहायला मिळाला. कल्याणमधील नामांकित ओम कबड्डी संघाचे खेळाडू आपापसात भिडले. शंकरराव चौक परिसरात भर रस्त्यात या कबड्डीपट्टूंमध्ये राडा झाला. याचदरम्यान प्रसिद्ध खेळाडू प्रशांत चव्हाण आणि भाऊ पंकज चव्हाण दोघांना मारहाण करण्यात आली.
कल्याण : कल्याणमध्ये कबड्डीपट्टूंमध्ये राडा पाहायला मिळाला. कल्याणमधील नामांकित ओम कबड्डी संघाचे खेळाडू आपापसात भिडले. शंकरराव चौक परिसरात भर रस्त्यात या कबड्डीपट्टूंमध्ये राडा झाला. याचदरम्यान प्रसिद्ध खेळाडू प्रशांत चव्हाण आणि भाऊ पंकज चव्हाण दोघांना मारहाण करण्यात आली.
या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एका खेळाडूला संघातून बाहेर काढण्यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
जलकुंभाची पाहणी करणाऱ्या अभियंत्याला नशेखोरांची मारहाण, औरंगाबादच्या सिडको परिसरातील प्रकार