Kalyan Loot : आधी प्रवासादरम्यान लोकांशी ओळख करायची, मग दुप्पट पैशाचे आमिष दाखवून साथीदारांसह लुटायची !

ठाणे येथील राबोडी परिसरात राहणारे अजीम करवेकर हे कळवा येथे रिक्षा चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात एक महिला बसली आणि त्यांच्याशी बोलता बोलता ओळख वाढवली. त्या महिलेने काही दिवसात अजीम यांचा विश्वास संपादन केला.

Kalyan Loot : आधी प्रवासादरम्यान लोकांशी ओळख करायची, मग दुप्पट पैशाचे आमिष दाखवून साथीदारांसह लुटायची !
दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या चौघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 5:12 PM

कल्याण : प्रवासादरम्यान लोकांशी ओळख करुन त्यांना लुटणाऱ्या बंगालच्या टोळीला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आधी लोकांचा विश्वास संपादन करायचे, मग रियाल करन्सीच्या नावाने पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालायचे. इसाक शेख, सोफीकुल शेख, इमरान खान आणि हमिदाबीबी गाजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाण्यात राहणाऱ्या अजीम नावाच्या इसमाच्या मुलीचे लग्न असल्याने त्याला पैशांची गरज होती. तोही या चार जणांच्या आमिषाला बळी पडला. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली अन् प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी सापळा रचत या चौघांनाही बेड्या ठोकल्या.

ठाण्यातील एका रिक्षाचालकाला लुटल्यानंतर प्रकरण उघडकीस

ठाणे येथील राबोडी परिसरात राहणारे अजीम करवेकर हे कळवा येथे रिक्षा चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात एक महिला बसली आणि त्यांच्याशी बोलता बोलता ओळख वाढवली. त्या महिलेने काही दिवसात अजीम यांचा विश्वास संपादन केला.

चर्चेदरम्यान तिने सांगितले की, मी अशा काही लोकांना ओळखते जे पैसे दुप्पट करून देतात. अजीम यांच्या मुलीचे लग्न होते, त्यामुळे त्यांना पैशांची गरज असल्याने ते आमिषाला बळी पडले. या महिलेने आपल्या साथीदारांशी अजीम यांची भेट घालून दिली.

हे सुद्धा वाचा

रिक्षाचालकाला 1 लाख 80 हजाराचा लावला चुना

या भेटी दरम्यान या चौघांनी अजीम यांना रियाल करन्सी दिली. ते करन्सी त्याने बाजारात चालवली त्यांना पैसे मिळाले. त्यानंतर अजीम यांना विश्वास पटल्यानंतर त्यांनी एक लाख 80 हजार रुपये या चौघांना देण्याचे ठरवले. त्यानुसार या चौघांनी त्यांना अजून रियाल करन्सी घेण्यासाठी कोळसेवाडी परिसरात बोलावले.

अजीम यांच्याकडून एक लाख 80 हजार रुपये घेत त्यांच्या हातात रियाल करन्सी सांगत रुमालात बांधलेले एक बंडल दिले. काही वेळाने अजीम यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यांना या रुमालात कागदाचे बंडल असल्याचे दिसून आलं.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाने पोलीस ठाणे गाठले

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला.

तांत्रिक बाबी तपासात पोलिसांनी आरोपींचा मोबाईल ट्रेस करत त्यावर येणारा नंबर मिळवत त्याची विचारपूस करत असताना त्या व्यक्तीला सुद्धा या चौघांनी असेच आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले. त्यालाही लाखो रुपयांची करन्सी देण्याचे आमिष दाखवून कल्याण कोळसेवाडी परिसरात बोलवले.

पोलिसांनी सापळा रचत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे आणि पोलीस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने त्या व्यक्तीच्या मदतीने कोळसेवाडी परिसरात सापळा रचत या चौघांनाही बेड्या ठोकल्या. या चौघांनी आणखी किती जणांना फसवले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.